पान:भूमी आणि स्त्री.pdf/२७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिवलिंगाच्या रूपात स्वीकारली गेली. या संदर्भात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे तंत्रसाधना होय.
 तांत्रिकांचा वामाचार मूलतः लोकायतिकांचा सुफलीकरण विधी होता. या विधीचे अधिष्ठान धर्म कल्पना नसून यातुकल्पनाच असावी असे ज्येष्ठ अभ्यासकांचे मत आहे. कालौघात वैदिकांनी आपल्या धर्मसाधनेत तंत्रसाधनेचा समावेश करून घेतला. भारताचा इतिहास हा संस्कृती संगमाचा इतिहास आहे. तंत्रसाधनेप्रमाणे इतरही अनेकविधी वैदिक आर्यांच्या जीवनात प्रतिष्ठित झाले. या संदर्भात देवीप्रसाद चटोपाध्यायांनी बकदाल्भ्य आणि गाणारे कुत्रे यांचे समर्पक उदाहरण देऊन विस्तृत चर्चा केली आहे . बकदाल्भ्य हा ऋषिकुमार वेदाध्यनासाठी जात असताना त्याने एक चमत्कारिक दृश्य पाहिले. काही कुत्रे एका पांढऱ्या कुत्र्याभोवती जमा होऊन 'आम्हाला मंत्रगानाने अन्न प्राप्ती करून द्या. आम्ही भुकेले आहोत' अशी मागणी करीत होते. त्या पांढऱ्या कुत्र्याने दुसऱ्या दिवशी त्यांना एकत्र येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण ज्याप्रमाणे विशिष्ट कृती करून मंत्रपठण करतात त्याप्रमाणे सर्वांनी हिंकार स्वर लावला. त्या मंत्रघोषालाच उद्गीथ-अन्नप्राप्तीसाठी मंत्रगान म्हटले जाते. छांदोग्य उपनिषदात १.३.६ मध्ये उद्गीथ गानाने विपुल अन्न प्राप्ती होते असे सांगितले आहे, बकदालभ्य हा वेदविद्येचा त्याग करून चालला होता. त्याला मंत्रगानाचे माहात्म्य सांगण्याचा हेतू उपनिषदकारांचा असावा का? कारण त्याच्या संदर्भात 'स्वाध्यायं उद्वव्राज्य' असे वाक्य वापरले आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मणात बकदाल्भ्य आणि इंद्राचा संघर्ष झाल्याचा उल्लेख आहे आणि पुढे छांदोग्य उपनिषदात बकदाल्भ्य नैमिषारण्यातील लोकांना अन्नप्राप्ती करून देण्यासाठी यज्ञात उद्गाता म्हणून गेल्याचा उल्लेख आहे.
 कुत्रे नव्हे माणसेच : टॉटेमिक समाज -
 काही विद्वानांनी वरील कथेतून यज्ञसंस्था आणि ब्राह्मण पुरोहितांना येणारी मंत्रविद्या यांचे विडंबन केले आहे असे मानले. परंतु देवीप्रसाद या संदर्भात विश्लेषण करतात की हे 'कुत्रे' म्हणजे प्राथमिक अवस्थेतील माणसे आहेत. प्राथमिक अवस्थेतील माणसांची मंत्रगानाने अन्नप्राप्ती करून घेता येते अशी श्रद्धा होती. अशा

भूमी आणि स्त्री
२७३