भारलेली सुवर्णमय शक्ती असून ती द्रौपदीच्या शक्तीचे प्रतीक असल्याचे मानले जाते. तिगला ही निम्नस्तरीय जात मानली जाते. डॉ. कोसंबींच्या मते मुळात हा उत्सव स्त्रियांचा होता. त्यांच्याकडून तो पुरुषांकडे आला असावा. हा उत्सव चैत्री पौर्णिमेनंतर नऊ दिवस चालतो. अलीकडे त्यात काही बदल झाले आहेत. पूर्वी 'करगा कुंभ' तिगला पुजारी हाताने बनवीत असे. अलीकडे तो कुंभार बनवतात. हा कुंभ शेवटच्या दिवशी तळ्यात विसर्जित करतात. मात्र त्यात ठेवलेली, द्रौपदीचे प्रतीक असलेली 'सुवर्णशक्ती' तिगला पुजारी श्रद्धापूर्वक घरी आणतो. पुढच्या वर्षी पुनश्च तिचे आवाहन करण्यासाठी. १८'करगा' कुंभात द्रौपदीची सुवर्णरूपी शक्ती असते. त्या बरोबर पाच चुन्याने रंगवलेली मडकी पांडव म्हणून मांडतात. त्यात साधे व नारळाचे पाणी ठेवतात. या सर्व बाबी 'इळाआवसे' च्या संदर्भात महत्त्वाच्या वाटतात. 'करगा' उत्सव कर्नाटकात साजरा होतो. इळाआवस मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यांत विशेष करून साजरी होते. या भागात कर्नाटकातील लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर स्थिरावला आहे.
पौषातील रविवारी सूर्यपूजन :
संपूर्ण मराठवाड्यातील स्त्रियांचे व्रत -
मार्गशीर्ष, पौष महिन्यात बोरं, गाजर, आवळे, चिंचा यांचा मोसम असतो. रबीची पिके पोटऱ्यात येत असतात. या काळात शेताला ओलावा दवाच्या रूपाने मिळतो. या महिन्यात विवाह संस्कार करीत नाहीत. पायाचा दगड रोवण्यास हा महिना योग्य मानतात. या महिन्याला शून्य महिना म्हणतात. मराठवाड्यातील प्रत्येक घरातील स्त्री, सर्व जातिजमातीतील स्त्रिया या महिन्यातील दर रविवारी सूर्यपूजा करतात. खानदेशात रविवारी आदित्यराणूबाईची पूजा श्रावणात करतात. मराठवाड्यात मात्र हे व्रत, सर्व स्तरांतील स्त्रिया 'पुसातले रविवार करतात. स्त्रिया पहाटे उठून सूर्याचे पहिले किरण पृथ्वीवर येण्याआधीच नाहतात. सूर्याची रांगोळीची प्रतिमा पाटावर मांडतात. लिंगायत समाजात रांगोळीऐवजी भस्माचा वापर करतात. सूर्याशेजारी गंगा आणि गौरी काढतात. या गंगा व गौरी सूर्याशेजारी कशा हे एक कोडे आहे. सूर्याशेजारी उषा, प्रत्युषा, संज्ञा व छाया यांपैकी असाव्यात. पुराणानुसार राज्ञी व निक्षुंभा या सूर्यपत्नी आहेत. भारतीय लोकधर्मानुसार रण्णा सण्णा ही जोडनावे
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२५२
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भूमी आणि स्त्री
२४७