आहे. त्यांचा परामर्ष होताना त्याची सखोल चर्चा होईल. तत्पूर्वी सूर्याविषयीच्या विविध कल्पना जाणून घेणे महत्त्वाचे वाटते.
सूर्याची उत्पत्ती -
सूर्याला सविता, विवस्वान्, पूषा अशी अनेक नावे आहेत. अथर्ववेदात त्याला सात नावे असून ती सूर्याच्या सात किरणांची आहेत. महाभारतात सूर्याची बारा नावे आहेत.या नावांवरून सूर्यनमस्कार घातले जातात. सूर्याच्या उत्पत्तीविषयी भिन्नभिन्न प्रकारच्या कल्पना आढळतात.
१. तो इंद्राचा पुत्र आहे (ऋ. १०.१९०.३) पौराणिक साहित्यात तो कश्यप आणि आदितीचा कनिष्ठ पुत्र आहे. तो अवयवरहित जन्मला म्हणून मार्तंड ही संज्ञा त्याला मिळाली.
सूर्याचे रूपगुण वर्णन करताना सूर्यास आकाशाचा अलंकार म्हटले आहे. उषाही त्याचा मार्ग मोकळा करून देते. त्याच्या रथाला सात घोडे असतात. सूर्याने द्युलोक सावरून धरला आहे. सूर्य हे देवाचे सुंदर मुख आहे. तो मित्र, वरुण, अग्नी३ यांचा डोळा आहे. मराठीत एक म्हण आहे. 'जे न देखे रवि ते देखे कवी' रवि म्हणजे सूर्य तो विश्वदर्शन करणारा असतो. मनुष्याची बरीवाईट कृत्ये त्याला दिसतात. सूर्य धन्वंतरी आहे. तोमानवाच्या व्याधी दूर करतो.तो विश्वकर्ता, देवांचा पुरोहित आहे. तो स्वर्णनेत्र, स्वर्णहस्त, स्वर्णभुज (ऋ. १.१३५.६.७१) आहे. तो रक्तवेषधारी आहे. त्याचा रथ सोन्याचा असून दोन प्रकाशमान घोडे तो रथ ओढतात. तो पृथ्वी आणि आकाश यांना प्रकाशमय करतो.
या संदर्भात लोकपरंपरांच्या चिकित्सक अभ्यासक दुर्गा भागवत म्हणतात, ४सूर्य दैवतकथा वेदात उपलब्ध नाहीत. त्याची बारा नावे व काही उल्लेख मिळतात. विस्तृत कथा मिळत नाही. मात्र उत्तर काळात सूर्याच्या अपंगपणाच्या अनेक दैवतकथा उपलब्ध आहेत. परंपरांचेही विश्लेषण सापडते.
सूर्य अपाद -
पुराणात काही कथा सापडतात पण त्या त्रोटक आहेत. त्या अशा -
१. सूर्याची भार्या संज्ञा ही विश्वकर्म्याची मुलगी. तिला सूर्याचे तेज असह्य झाले
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२३५
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३०
भूमी आणि स्त्री