पान:भूमी आणि स्त्री.pdf/२०१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वा लाकडी मुखवटे असतात. धुळ्याचे जुने जाणते अभ्यासक श्री. भा. रं, कुळकर्णीच्या मते कानबाई म्हणजे वेदात उल्लेख असलेली रण्णासण्णा देवता असावी. कानबाईची गाणी म्हणणारे शाहीर वा भाट असतात. कानबाईची गाणी हिंदोळ्यावर बसून स्त्रिया गातात. कानबाई ही साक्षात लक्ष्मी आहे मानले जाते. या काळात सुनेला घरी आणतात. कानबाईचे रोट शेतातील हिरव्या पोकळ्याची हिरवी पालेभाजी व इतर पालेभाज्या आणून त्याचा तेल तूप न घालता करतात. हे रोट कानबाईची स्थापना करण्यापूर्वी करतात. हा रोट सव्वापाव सव्वा किलो अशा मापाने असतो. असा हा रोट दुपार पर्यन्त घरातील सर्वांनी संपवायचा असतो. हा कोरडा रोट व भाजी संपल्यावर कानबाईची स्थापना होते. नंतर पुरणाचे रोट करतात. पुरणपोळ्या करून दोन मोठे दिवे एक कानबाईसाठी व एक घरातील सर्वांना प्रसादासाठी करतात. घरातील सर्व स्वयंपाक सायंकाळी कानबाईसमोर ठेवतात. नैवेद्य दाखवून घरातील सर्व मंडळी एकाच वेळी जेवायला बसतात. पाहुण्यांसाठी वेगळा स्वयंपाक करावा लागतो. पुरणाचा रोट फक्त घरच्यांनीच खायचा असतो. कानबाई समोरचा दिवा वाढवू नये म्हणून सतत काळजी घेतली जाते. कानबाईचा हा सण देशावरील महालक्ष्म्या व कोकण कोल्हापुराकडील गौरींसारखा आहे. कानबाई ही लक्ष्मीचे रूप असते.
 दिवा सुफलीकरणाचे प्रतीक -
 महालक्ष्मी, कानबाई, गौरी, नवरात्र या कुलाचारात सतत तेवत्या दिव्याला अपार महत्त्व असते. दिवा हे सुफलीकरणाचे प्रतीक मानले जाते. घरातील प्रमुख स्त्री हा दिवा सतत तेवत राहावा यासाठी सतत जागरूक असते. दिवा जणु साक्षात चैतन्य आणि जमिनीतील उर्वराशक्ती उत्तम पिकांच्या रूपाने तिच्यातील चैतन्याची साक्ष देत असते. कानबाईची प्रतिष्ठा रविवारी होते. या देवीचे साम्य वेदकालीन रण्णासण्णाशी जाणवते. आदितवारी पौष महिन्यात आदित्यराणूबाईची पूजा केली जाते. त्यावरून या व्रताचा संबंध सूर्याशी असावा असे मानले जाते.
 श्रावण भाद्रपदातील देवीव्रते धान्यसमृद्धीसाठी असतात. त्यात स्त्रीच्या मातृत्वाची, सुफलनशक्तीची उपासना असते. अपत्यसंभव, अपत्याचे पोषण, पर्यायाने मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाची सुरक्षितता

१९६
भूमी आणि स्त्री