उत्तर मिळते. भारतीय संस्कृति कोशातील या शब्दाला आधार देणारे विवेचन असे ज्यांची व्रतपूर्वक पूजा केली जाते. त्या चन्द्राच्या सोळा कळा या प्रमाणे आहेत.
१. शंखिनी | २. पद्मिनी | ३. लक्ष्मी | ४. कामिनी |
५.व्यपिनी | ६.ऐश्वर्यवर्धिनी | ७.मोंदा | ८. आश्चर्यदा |
९. आल्हादिनी | १०.व्यापिनी | ११. मोहिनी | १२. प्रभाप्रदा |
१३. क्षीरवर्धिनी | १४.वेगवर्धिनी | १५.विकासिनी | १६. सौमिनी |
आपण लक्ष्मी पार्वतीला बोलावतो त्या आपल्या परिवारासह येतात म्हणून १६ चा महिमा असावा. २७ नक्षत्रांपैकी १६ नक्षत्रे संपूर्ण १७ वे नक्षत्र अनुराधा. या मोसमात पिके घराला येतात. शेतातील धान्यलक्ष्मी घरी येऊ लागते. भाज्या फळभाज्यांची रेलचेल असते. जणु १६ नक्षत्रांचे फलित म्हणजे धान्यलक्ष्मी. म्हणून 'सोळा' या आकड्याला महत्त्व.
१६ पक्वान्ने, १६ भाज्या, १६ पत्री या कुलाचारासाठी असतात. मात्र महत्त्वाचे पदार्थ वऱ्हाडात आंबिल व कथली असतात. प्रा. वामनराव चोरघडे म्हणतात. हा सण बहुजन समाजाचा असल्यामुळे आंबिल आणि कथलीशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही. आंबिल ज्वारीचे पीठ शिजवून करतात तर कथली म्हणजे पडवळ घालून केलेली कढी. जे सहज उपलब्ध होते ते मनोभावे रांधून घातले तर ही महालक्ष्मी गरिबाला पावते. मनोमन तृप्त होते.
तिसऱ्या दिवशी रात्री उत्तरपूजा करून दहीभाताचा आणि लक्ष्म्यांनी मुरडून यावे म्हणून कानोल्याचा नैवेद्य पुढे ठेवायचा. आता घर सुने होणार म्हणून भरल्या डोळ्यांनी लक्ष्म्यांच्या डोक्यावर अक्षत टाकून 'पुनरागमनायच' असे म्हणत मुखवटे उतरवायचे.
खानदेशातली कानबाई -
वऱ्हाड कोकण, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर या भागात गौरी महालक्ष्मीचा थाट तसा खानदेशात कानबाईचा डौल असतो. कानबाई श्रावणातच दीड दिवसाच्या माहेरपणाला येते. ती महादेवी पार्वतीचे रूप मानले जाते. श्रावण महिन्यात नागपंचमीनंतरच्या रविवारी १४कानबाईची स्थापना करतात. कानबाईचेही धातूचे