Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

श्रद्धा जुन्या शेतकरी समाजाला होती. या संदर्भात श्रीमती माई पांडे यांनी सांगितले की पूर्वी सुईण- मांग समाजाची असे. त्या काळात तिचा विटाळ नसे. रेणुकेचा परशुरामाने शिरच्छेद केल्यावर तिला जिवंत करतांना चुकीने आईऐवजी मांग स्त्रीचे शिर आणले अशी मिथक कथा आहे.
 ज्या जोडप्याला जुळे आहे अशा स्त्रीकडून पेरणी करायाची चाल आफ्रिकेच्या मध्याभागात होती फ्रेझर म्हणतो - 'A fruitful women makes plants fruitful and a barren women makes them barren' अशी समूह श्रद्धा ऑस्ट्रिया, बव्हेरिया होती. धान्योत्पादनाचा शोध स्त्रीने लावला. 'स्त्रीला शेतात पुरा, त्यातून धान्य येईल' ही Myth जगभर आहे.
 नागपंचमी : नागपूजेचे प्राचीनत्व -
 श्रावण शुद्ध पंचमीस महाराष्ट्रभर नागपंचमीचा सण सामूहिक उत्साहाने साजरा होतो. नागपूजा ही अत्यंत प्राचीन आहे. तैत्तिरीय संहितेत नागपूजेचा निर्देश आहे. ऋग्वेदात मात्र नागपूजेचा उल्लेख नाही. पुराणात विष्णु व शिवाच्या बरोबर नागाचा उल्लेख आहे. विष्णु शेषशाई आहे. तर शिवाच्या गळ्यात नाग आहेत. बौद्ध धर्मातही नागांचा उल्लेख आहे. जैन धर्मातही नागाचा उल्लेख आहे. बुद्धाच्या जन्मानंतर नंदउपनंद या नागांनी त्याला स्नान घातले असा उल्लेख आहे. बौद्ध काळात ब्राह्मण नागपूजा करीत असे चिनी प्रवाशाने लिहून ठेवले आहे.
 सिंधू नदीच्या परिसरातील प्रत्येक गावात नागाची मंदिरे वा मूर्ती असतात अशी नोंद ह्युएनत्संगने केली आहे. तक्षशीलेचे राजे नागपूजक होते. त्यांनी आपल्या चिन्हावर नागप्रतिमा मुद्रित केल्या होत्या. अश्वमेघ यज्ञप्रसंगी लोहितादी आणि बायस या नागांचे पूजन करावे असे सांगितले आहे.
 भारतभर नागपूजा प्रचलित -
 सौराष्ट्रात प्रत्येक गावात वेशीवर सर्पमंदिर आहे. उत्तर हिंदुस्थानात चंबा, कांगडा खोऱ्यात आणि काश्मीरमध्ये कैक ठिकाणी नागमंदिरे आहेत. काश्मीरमध्ये ७०० ठिकाणी नागाकृती कोरल्या असून त्यांची आजही पूजा केलीजाते. शेषनाग, इन्द्रनाग, संतनाग अशी अनेक देवळे प्रसिद्ध असून चिनाब नदीच्या तीरावर वासुकीचे मंदिर

१५६
भूमी आणि स्त्री