पान:भूमी आणि स्त्री.pdf/१६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



काया वावरमा धवया नंदीनं आऊत
भाऊना सारिखा कुनबी नही शे गावात ....

 ती भावाला रीतीभाती शिकविते. नागपंचमीला औत जुंपू नकोस सांगताना म्हणते -

पंचमीच्या दिशी देती नागाला पऊतं
दादा माझ्या सोयऱ्या सोड कुणब्या आऊत...

 संस्कृतीच्या, कुटुंब बांधणीच्या प्रवासात मातृसत्ताक जीवनव्यवस्थेतील, जमिनीची मालकीण 'स्त्री' चा मोहरा, पितृसत्ताक कुटुंबसंस्थेचा स्वीकार करताना, पतीच्या घरात हलविला गेला. परंतु भावाची कन्या सून म्हणून स्वीकारून, तिने स्वतःचा अधिकार आईच्या घरात ठेवला. ती भावाला प्रेमाने नागाची आणि शेताची बांधीलकी सांगते. परंतु सोयऱ्याच्या नात्याने औत सोड अशी आज्ञाही देते.
 नागरणीनंतर पेरणीपूर्वी शेताच्या देवता सप्तमातृका सात दगड मांडून, प्रतीकाद्वारे पूजतात. तसेच पाच पांडव आणि कुंती आणि द्रौपदी दगडाच्या रूपाने पूजतात. त्यांचा संदर्भ ओव्यांतून येतो.

शेतीच्या मावल्या या कुणी पूजिल्या गंधवानी
ताईता बंधूजीची सीमा सांडली जुंधळ्यांनी...

 ज्वारी, बाजरी, सांडेस्तो, भरभरून पिकू दे, हे मनचे गुज सांगतांना बहीण म्हणते -

जवारी बाजरीची सोय मनी सांडायनी
खाल्ताना बांधले पांभेर भाऊ पांडवांनी...

 सात माऊल्या आणि पाच पांडव, दोघी सासूसुना- कुंती, द्रौपदी यांचे शेतीच्या विधींतील महत्त्व हा अभ्यासकांना चकित करणारा विचारांना चालना देणारा असा मुद्दा आहे. इळा आवसेच्या पूजेच्या संदर्भात त्याचा विशेष विचार केला आहे.
 शेतात पेरणी करायचा मान काही भागात मांगिणीला दिला जातो. विशेष करून शेतातले गडी मांग समाजाचे असावेत, त्यांनी केलेल्या कामात लक्ष्मी वसते अशी

भूमी आणि स्त्री
१५५