पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२

 कांहीं ठिकाणीं जोडशब्दांतील उत्तरशब्द, व कांहीं ठिकाणीं पूर्वशब्द, केवळ वाक्यालंकाराप्रमाणें सौंदर्य आणण्याकरितांच योजिला असतो. जसें - केरकचरा, थोडेबहुत, कमज्यास्त, अधिकउणें इ०.

 कांहीं स्थलीं विशेषणांचाही मुख्य वाच्यार्थ सुटून लाक्षणिक अर्थ घेतला जाती. जसें--मी दहादां (अर्थात् पुष्कळ वेळां) तुला सांगितलें. तसेंच सतरादां, हजारदां इ०.

 संस्कृतांतही अशा प्रकारचा मासला पुष्कळ ठिकाणीं दृष्टीस पडती. जसें--

 सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्. (पुरुषसूक्त.)

 शतं विहाय भोक्तव्यं सहस्रं स्नानमाचरेत् ||

 लक्षं विहाय दातव्यं कोटिं त्यक्त्वा हरिं भजेत् || १ ||

    (नारायणोपनिषद्.)

 कांहीं ठिकाणीं तर नुसत्या संख्यावाचक विशेषणांचाही असा अर्थ होतो. जसें:-चारचौघे गोळा झाले ह्मणजे छी थू करतील ना?

 कांहीं स्थलीं संख्याविशेषणाचे जे न्यूनाधिक अर्थदर्शक जोडशब्द झालेले असतात त्यांच्या न्यूनार्थाचा त्याग करून त्या ठिकाणीं अधिकार्थाचाच सरासरी मानानें संग्रह केला जातो:-जसें, शेंपन्नास रुपये लागले तर खर्च कर.

 सारांश शब्दाच्या अर्थाकडे नजर ठेविली असतां रूढ शब्द सहज लक्षांत येतील.