पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१

समानधर्मीच ह्मणजे एक दुसऱ्याच्या धर्माला पुष्टी व सारखेपणा देणारेच असतात. जसें:--'जेवणखाण झाल्यावर बाहेर जातां येईल.'

 यांत 'जेवणखाण' ह्या जोडशब्दांतील खाण (खान) ह्या शब्दानें जेवणाशीं समानधर्मक जीं इतर कृत्यें त्यांचा बोध होतो.

 हे जोडशब्द निरनिराळ्या रीतीनें झालेले असतात; त्यांचें विशेष विवेचन करण्याऐवजीं उदाहरणार्थ थोडेसें येर्थ देतों:-अमीरउमराव, राजाबाबू, अन्नोदक, पथ्यपाणी, पोरसोर, भाजीपाला, शालदुशाला, चंदीचारा, मालताल, विंचूकाटा, मानपान, चिरगूटपांघरूण, चाकरनोकर, पानपट्टी इ.

 वरील शब्दांचा लक्षणदृष्टीनें विचार केला असतां, असें कळून येईल कीं प्रत्येक शब्दांतील पुढील शब्द मागील शब्दाचा समानधर्मी आहे.

 कित्येक वेळां आद्यक्षराचे जागीं प्रायः 'बी' व क्वचित् ‘गी' हें अक्षर घालून जो शब्द होईल तो मूल शब्दास जोडून बोलण्याचा परिपाठ आहे. जसें -- वरणबिरण, भातबीत, सापबीप, किंवा सापगीप.

 कांहीं स्थलीं तर दुसरीच अक्षरें घालून ते शब्द मूळशब्दापुढें बोलण्याचा परिपाठ आहे. जसें-भांडेंकुंडें, माणूसकाणूस इत्यादि.