पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३

प्रमाणें वागणें;' 'रत्न शब्दानें' 'पुरुष'; 'नाचूं लागणें' शब्दांनीं 'हर्ष पावणें;' 'गंगेवर' शब्दानें 'गंतातटाकीं;' 'घरांवरून' शब्दानें 'घराजवळून' आणि 'गाय शब्दानें 'गायीप्रमाणें गरीब;' असे अर्थ अभीष्ट असल्याचें दिसतें, ह्मणून त्या त्या शब्दाचे हे जे वाच्यार्थाहून भिन्न दुसरे अर्थ घेतले जातात, हे मुख्यार्थ नसून कल्पित आहेत ह्मणून हे लक्ष्यार्थ होत.

 आरंभीं दिलेल्या दुसऱ्या उदाहरणांत गूढार्थ सुचविण्याकरितां मुद्दाम केलेला लक्ष्यार्थ दाखविला आहे. त्यांत 'युनिव्हर्सिटींत मराठी भाषा नसण्याविषयीं संमती देणारे महाराष्ट्रीय जन धन्य होत.' असा तर वाच्यार्थ आहे, परंतु वक्त्याचा हेतु खरोखर त्यांस धन्य ह्मणण्याचा नाही; तेव्हां अर्थातच वक्तयाच्या आशयाशीं वाच्यार्थाचा विरोध आला, ह्मणून ह्या वाक्याचा वाच्यार्थ सोडून देऊन तद्विपरीत 'ते अधन्य होत' असा अर्थ कल्पिला ह्मणजे संगती जुळते. हा अधन्यतारूप अर्थच लक्ष्यार्थ आहे. आतां विपरीत अर्थाचें वाक्य उच्चारून लक्ष्यार्थ करण्याचें वक्त्यास कारण, संमती देणारांची निंदा करावी हें होतें; निंदा हाच गूढार्थ- त्यास सुचवावयाचा होता; तो वाच्यार्थानें सुचविला असतां अगदीं स्पष्ट होती, व त्यास तो गूढ ठेवावयाचा होता, ह्मणून तो लक्ष्यार्थानें सुचविला. "बाळ्या मोठा शाहणा आहे." "हे तर काय राजेच आहेत." इत्यादि वाक्यांत "शाहणा" व "राजे" ह्या शब्दांचा लक्ष्यार्थ मूखे अंसा आहे. तो