पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 शब्दांची योजना करितांना मुख्यत्वेंकरून शब्ददोष टाळले पाहिजेत, व शब्दगुण साधले पाहिजेत. ह्याकरितां ते दोष, व गुण सांगतों.

शब्ददोष.


 शब्ददोष सहा आहेत, ते हे:-च्युत संस्कृति, अप्रयुक्त, संदिग्ध, व्यर्थ, अश्लील आणि अप्रतीत. ह्यांचीं लक्षणें व उदाहरणें.
१. च्युत संस्कृति-व्याकरणरीत्या जे शब्द अशुद्ध असतात, ते वापरले असतां, हा दोष होतो. त्यांचीं उदाहरणें देण्याची गरज नाहीं. कारण ते व्याकरणशास्त्र शिकल्यानेंच कळणारे आहेत, व तो विषय निराळा आहे.
२. अप्रयुक्त-जे शब्द व्याकरणरीत्या शुद्ध असतात पण मान्य ग्रंथकारांच्या लेखांत, किंवा उत्तम वक्त्यांच्या भाषणांत, कधीं वापरण्यांत येत नाहींत, असे शब्द योजिले असतां हा दोष होतो. जसें-संस्कृतांत ‘स्वप्न' शब्द पुल्लिंगी व ‘जन्म' शब्द नपुंसकलिंगी आहे. परंतु मराठी भाषेत 'स्वप्न' शब्द नपुंसकलिंगी व ‘जन्म' शब्द पुल्लिंगी ह्मणून वापरला जाती. तेव्हां कोणीं 'मला आज स्वप्न पडला.' 'अमक्या वर्षों त्याचें जन्म झालें.' अशीं वाक्यें लिहिलीं तर तीं व्याकरणरीत्या जरी शुद्ध असली, तरी त्यांत हा दोष होईल.
३. संदिग्ध-शब्दाच्या अर्थाविषयी जेथें संशय उत्पन्न होतो, तेथें हा दोष होतो. जसें-"रामासक्त