पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२

काढणारास स्वतःच्या बुद्धीची धन्यता वाटते व योजकाच्या चातुर्याचें कौतुक वाटतें तो. ह्यांत प्रहेलिका, प्रश्नोत्तर इत्यादिक अलंकार येतात. जसें--

 "श्रीराम जयराम जयजयराम" हा राममंत्र पंतांनीं खालीं लिहिल्याप्रमाणे साधला आहे:--

 श्रीमान् राजशिरोमणि दशरथ तो निज यशें बरा महित ||

 द्विजसेवक यज्ञनिरत जनभयहर्ता धरा निकाम हित ||

गद्यरूपानें.

 सज्जनाचा संग केवळ सुखदायक असून तो ग्रीष्मऋतूंतील वटवृक्षाच्या शीतळ छायेप्रमाणें वपूला तोष देणारा होतो, इतकेंच नाहीं तर बाह्यांतर शुद्ध होण्यास हाच प्रधान असून पुढें याच योगानें जितेंद्रिय राहण्याचीही सवय लागते. उच्चकुलांत उत्पन्न होऊन सकल विद्या संपादन केली तथापि श्रृंगारविषयोकडे चित्त रममाण झालें म्हणजे सार वस्तु कोणती ती मुळींच कळत नाहीं, ती कळण्यास सज्जनाचा संगच कारणीभूत होतो यांत संशय नाहीं.

४ पदार्थाच्या आकृतीप्रमाणें वर्णरचना करण्याचा वर्ग.

 चित्रावलोकनाप्रमाणें आकृतीच्या अवलोकनाचा चमत्कार असतो तो.

 ह्या वर्गातही अनेक भेद आहेत. त्या सर्वांस एकचित्र असें सामान्य नांव आहे.

 जसें - "सर्वदा ईश्वराचें चिंतन करणें हेंच मनुष्याचें