पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१
श्लेषानें.

 यजमान – गण्या, घरांतून तेवढा रेशीमकांठी धोतरजोडा घेऊन ये.

 गण्या – हुकूम महाराज, ( असें म्हणून आंतून येऊन म्हणतो )

 महाराज, रेशीम तर घरांत शिल्लक नाहीं; काठी, धोतर आणि जोडा आणिला आहे.

काकूनें होणारा.

 कोणी गृहस्थ गांवास जात असतां त्याचा बारा तेरा वर्षांचा मुलगा गांवाहून येईपर्यंत एका गृहस्थाच्या येथें ठेवण्यास गेला. त्या गृहस्थानें सहज विनोदानें ह्यास विचारिलें, कीं हा चोरीबिरी तर करणार नाहींना? त्यावर दोघांचा असा संवाद झाला.

 पहिला – माझा मुलगा चोरी करील?

 दुसरा - तर मग त्याला येथें उभेंही राहूं देऊं नका.

 पहिला – अहो, मी सांगतों तो नाहीं करणार.

 दुसरा - हं हं, तर मग तुम्हीही येथून चालते व्हा.

 ह्यांत ऐकणारानें पहिल्या वाक्यांतील वक्त्याच्या भाषणाचा काक्कर्थ मुळींच घेतला नाहीं व दुसऱ्या वाक्यांत तो मुळींच नसतां तेथें लाविला आहे.


३ गूढार्थाच्या चमत्कृतीचा वर्ग.

 एखादा इष्ट शब्द किंवा कांहीं अभिप्रेत अर्थ असा गूढ ठेविला असतो कीं, तो शोधून काढिला असतां,