पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/१००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८३

मुख्य व आवश्यक कर्तव्य आहे, पण तें कोणीच करीत नाहीं." हेंच वाक्य छत्राकृतीनें लिहिले आहे.

र्व दा
श्व रा चें चिं
णें हें
नु ष्या चें मु ख्य श्य
र्त व्य हे तें को णी
री
ना
हीं


अर्थालंकार.

 जेथें भाषणांत अर्थाचा चमत्कार असतो, तेथें त्यास अर्थालंकार हणतात. हे पुष्कळ आहेत, तथापि त्यांपैकी मराठी गद्यग्रंथांत वारंवार येणारे असे ८ अलंकार आहेत. ते हे:-१ उपमा, २ रूपक, ३ उत्प्रेक्षा, ४ दृष्टांत, ५ निदर्शना, ६ विशेषोक्ति, ७ व्याजस्तुति आणि ८ स्वभावोक्ति. ह्यांचीं लक्षणें व उदाहरणें.

उपम.

 दोन पदार्थांचें कांहीं एका गुणाच्या संबंधानं सादृश्य दाखविलें असतें, तेथें उपमालंकार होतो. जसें --