पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४

 "हें वर्तमान ऐकतांच माझें मन क्षुब्ध सिंधूंतील होडीप्रमाणें हेलकावे खाऊं लागलें."

 ह्यांत मनाचें व होडीचें हेलकावे खाणें ह्या गुणानें सादृश्य दाखविलें आहे.

 उपमालंकारांत १ उपमेय, २ उपमान, ३ वाचक आणि ४ धर्म ह्या चार गोष्टी अवश्य लागतात.

 १ उपमेय — ज्या पदार्थाला उपमा द्यावयाची तो पदार्थ. जसें—वरील उदाहरणांत, 'मन'.

 २ उपमान — ज्याची उपमा द्यावयाची तो पदार्थ. जसें–वरील उदाहरणांत, 'होडी'.

 ३ वाचक — सादृश्य पदाथ शब्द. जसें—जसा, जसें, तसा, तसें, प्रमाणें इत्यादि. जसें-वरील उदाहरणांत 'प्रमाणें'.

 ४ धर्म — उपमेय आणि उपमान ह्या दोन्ही पदार्थांत राहणारा साधारण गुण. जसें—वरील उदाहरणांत 'हेलकावे खाणें.'

 ह्यांपैक कांहीं नसलें तरी हा अलंकार होतो. उपमालंकाराचें दुसरें एक उदाहरण—

 "ज्या तुझ्या पुत्रास मी या हिंदच्या प्राणरक्षणाकरितां योग्य समजलें आहें, तो शहाणपणांत रामासारखा, युद्धांत भीष्माप्रमाणें, विद्येंत द्रोणासारखा, कल्याणांत महोदयाप्रमाणें, महात्म्यांत गीतेसारख, पवित्रतेंत गंगेप्रमाणें, कांतींत चंद्रासारख, औदार्यांत कर्णा-