पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८५

 प्रमाणें, आणि वश करण्यांत व प्रिय बोलण्यांत उर्वशीप्रमाणं निपजेल."

रूपक.

 दोन भिन्न पदार्थांत ते एकच आहेत असा जेथें अभेद दाखविला असतो, तेथें रूपक नांवाचा अलंकार होतो. जसें--

 "अशा वक्त्याचें भाषण ऐकून ज्याचा मनःसिंधु उचंबळणार नाहीं, असा कोण आहे?"

 ह्यांत मन आणि सिंधु हे दोन भिन्न पदार्थ असतां, त्यांचा येथें अभेद दाखविला आहे. आणखी उदाहरण. जसें--

 “युनिव्हर्सिटी ही एक क्षेत्रभूमि आहे. हिच्यांत प्रतिवर्षीं जे पदवीधर तयार होतात, ते हिच्यांतील फलवृक्ष होत, व त्यांच्या हातून जे ग्रंथ तयार होतात, ते त्या वृक्षांचीं फळें होत."

 ह्यांत युनिव्हर्सिटीचा क्षेत्रभूमीशीं अभेद करून तिच्या इतर पदवीधर व त्यांचे ग्रंथ ह्या अवयवांशींही भूमीच्या वृक्ष व फळें ह्या अवयवांचा अभेद केला आहे. ह्यास सावयवरूपक म्हणतात.

उत्प्रेक्षा.

 एखाद्या पदार्थावर हें अमुकच आहे, असा तर्क केला असतो तेथे उत्प्रेक्षालंकार होतो. जसें--

 १. "ह्या जंगलांत वणवा लागला होता ह्यामुळें धुराच्या अत्यंत मोठ्या धोतासह वणव्याच्या भयंकर ज्वाला

  भा० ८