पान:भाषाशास्त्र.djvu/96

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ८५ जिला पश्यन्ति आणि मध्यमा अवस्था कमशः प्राप्त होऊन, जिची परिणति वैखरीत झाली, तीच पुढे वाक् म्हणून उदयास आली, इतकेच नव्हे तर, ती आमच्या पुराणतम आर्य ऋषींच्या मुखाबाहेर पडल्यावर, तिच्यांत पदरचनेचे सौष्टव असल्यामुळे, तिची अर्थातच ऋचा बनली; व हा ऋचासमूहच ऋग्वेद झाला. । शिवाय, सहजगत्या केलेल्या भाषणांतही काव्याचा प्रादभव होऊन, त्याचे पद्य बनते, असे आपल्याला रामायणांत देखील दिसून आले आहे. कारण, क्रौंच पक्षाच्या जोडप्नापैकी, नराला एका निषादाने ठार मारल्यावर, त्याच्या मादीला झालेले भर्तृवियोगदुःख पाहून, वाल्मिकिमुनी त्यास शाप दिला की, , मानिषादप्रतिष्ठांत्वमगमःशाश्वतीः समाः। यत्क्रौंचमिथुनादेकमवधीःकाममोहितम् ॥१६॥ ( रामायण. बा. कां. सर्ग २ ). पुढे, ही स्वतःची वचनोक्ती पादबद्ध असल्याचे त्याच्या मनांत आले, व ती तशी आहेसे पाहून, त्याला मोठे आश्चर्य वाटले; आणि तो आपल्याशीच म्हणाला, पादवद्धोऽक्षरसमस्तंत्रलयसमन्वितः शोकार्तस्य प्रवृत्तोमे श्लोको भवतु नान्यथा १८ ( रामायण. बा. कां. सर्ग २ ). तदनन्तर, ह्याच छन्दोमय वाक्प्रवृत्तीने, वाल्मिकी ऋषीस मोठे प्रोत्साहन मिळून, त्याने रामायण रचलें, व ही गोष्ट सर्व जगासही विश्रुत आहे.