पान:भाषाशास्त्र.djvu/83

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ भाषाशास्त्र. होते, असे अनेक प्रमाणांना, व विशेषतः ऐतिहासिक पुराव्याने, अगदी शाबीत करून देता येण्यासारखे आहे. अतिपुरातनकाळी देखील, ह्या वाचेचे जे गौरव आमच्या हृदयांत वास करीत असे, किंवा तिच्यासंबंधाने जी विलक्षण धन्यता आम्हाला वाटत असे, तशी ह्या भूतलावरील अन्य कोणत्याही राष्ट्राला वाटली असल्याचे आढळून येत नाहीं. निदान, प्राचीनकाळी, किंवा प्राक्कालीन नावाजलेल्या राष्ट्रांत तरी, हिचे मनोभावाने गौरव करणारे, अथवा तिचा महिमा जाणणारे एकही राष्ट्र होते, असे दिसत नाही. शब्दांचे स्वरूप, वाचेचे मूल्य, आणि भाषेची किंमत, हीं समर्थासारख्या विरक्त व साधु पुरुषास देखील पूर्णपणे माहीत होती. इतकेच नव्हे तर, त्यांनीं तद्विषयक यथोचित वर्णन सुद्धा मोठ्या मार्मिकतेने केले आहे. कारण, एके ठिकाणी ते असे म्हणतात की, । की हे शब्दरत्नाचे सागर ।। की हे मुक्तांचे मुक्तसरोवर ॥ नानापुरीचे वैरागर। । निमण जाहले ॥ की हे अध्यात्मरत्नाची खाणी ।। | कीं हे बोलके चिन्तामणी ॥ नाना कामधेनूची दुभणी । वोळली श्रोतयांवरी ॥ की हे कल्पनेचे कल्पतरु ।। की हे मोक्षाचे पडिभरू ॥ नाना सायुज्यतेचे विस्तारू । विस्तारले ।।