पान:भाषाशास्त्र.djvu/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषापपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ७३ कीं हे अमृताचे मेघ वोळले ।। | कीं हे नवरसाचे वोघ लोटले ।। नाना सुखांचे उचंबळले । सरोवर हें ॥ की सुखाचीं तारवें लोटलीं। अक्षय आनंदे उलटलीं ॥ विश्वजनांसी उपयोगा आली । नाना उपयोगी कारणें ॥ वागदेवाचे वर्णन करतांना श्रीरामदासस्वामींनी आणखी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, आतां वंदीन वेदमाता ।। श्रीशारदा ब्रह्मसुता ॥ शब्दमूळ वाग्देवता ।। महामाया ॥ १ ॥ जे उठवी शब्दांकुर । | वदे वैखरी अपार ॥ जे निःशब्दाचे अभ्यन्तर । उकलून दावी ॥ २ ॥

  • * * ऐशी बहुवे नटली ।।

माया शारदा एकली ।। सिद्धचि अंतरीं संचली । चतुर्विध प्रकारे ॥ १३ ॥ नानाविद्या कळासिद्धि। नाना निश्चयाची बुद्धि ॥