पान:भाषाशास्त्र.djvu/66

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. ५५ म्यानच्या टापूत प्रचारात आहे. तथापि, तिची व्याप्त फार नाहीं. आतां, फक्त १ त्रिविष्टप-ब्रह्मी, २ कुलाली, ३ द्रा विडो, आणि ४ मल्याळी किंवा सा तामिली शाखेतील जलि मुद्रिक, ह्यांचाच विचार करणे राहिला भाषा, आहे. कारण, त्या दक्षिण तुराणी किंवा तामिलीच्याच शाखा असल्याविषयीं, कित्येक यूरोपीयन् पंडितांचे मत आहे. परंतु, त्यांबद्दलचे तपशिलवार विवेचन यापूर्वीच, ( मागे पान ३८ ते ४१ पहा. ) व भारतीय साम्राज्याच्या नवव्या पुस्तकांत केले आहे. सबब, येथे तद्विषयक ज्यास्त विचार करण्याचे प्रयोजन नाहीं.