पान:भाषाशास्त्र.djvu/6

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २ ) लीन जरठ व परिणत ऋषिवर्यांनी आपल्या मातृभाषेचे चांगलें लालनपालन केलें; तिला हरएक प्रकारे वाढीस लाविलें; व तिजला पूर्णत्वास आणून, ह्या भूतलावरील अखिल भाषांवर तिचे श्रेष्ठत्व स्थापिलें. इतकेच नव्हे तर, हें अमूल्य भाषाशास्त्र पद्धतशीर रीतीने कसे शिकावे, त्याचा शोध कसा लावावा, आणि त्याचे अन्वेषण कोणत्या त-हेने करावे, याबद्दलचा धडा सुद्धा पाणिनीसारख्या अद्वितीय बुद्धिमत्तेच्या सर्वमान्य ऋषीने, आज सुमारे चार हजार वर्षांपलीकडील कालांत, प्रथमतःच घालून दिला; व त्यायोगाने अनन्त उपकाराचे कधीही न फिटणारे ओझे एकंदर मनुष्यमात्रावर त्याने कायमचे करून ठेविलें. ही गोष्ट आम्ही सदैव ध्यानात ठेवण्यासारखी आहे; आणि म्हणूनच ती आह्मांला विसरतां कामा नये. । आतां, पाणिनीच्या पूर्वी आणि त्याच्या नन्तरही, तत्तत्कालानुरूप असे, अनेक पंडितांचे भाषाशास्त्रविषयक बरेच परिश्रम झाले होते, यांत बिलकुल शंका नाही. ११ पंडित सत्यव्रत सामश्रमाच्या मते, पाणिनीचा काल इ. स. पूर्वी २४०० वर्षे असल्याचे होते. (निरुक्त. उपोद्घात पु. ६ वें. भा. ७ वा. पा. जी-झी. ) डा. भांडारकराच्या अभिप्रायाप्रमाणे, पाणिनीचा काल इ. स. पूर्वी ७०० वर्षे असावा, असे वाटते. ( भांडारकरत दक्षिणचा प्राचीन इतिहास. पा. ८ ) पाश्चात्य पंडित वेयर, मॉक्समुलर, इत्यादींच्या मते, हा काल ३. स. पू. ३५० वर्षे असावा. ( संस्कृत वाङ्मयाचा त्यांनी केलेला इतिहास पहा. )।