पान:भाषाशास्त्र.djvu/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना.



केयूरा न विभूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वला
न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः ।
वाण्येकासमलं करोति पुरुषं या संस्कृता धार्यते ।
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग् भूषणं भूषणम् ।।

( नीतिशतक. )

 भाषेची उत्पत्ति कशी झाली, तिचेंं उद्गमस्थान कोणतें, तिचे मूळ कोणच्या भाषेंंत दृष्टीस पडतेंं, ह्या मूळ भाषेपासून कोणकोणत्या शाखा उद्भवल्या, ह्यांचे घटकावयव कोणते समजावयाचे, इत्यादि विषयक जी मीमांसा तेंच भाषाशास्त्र होय. हेंं शास्त्र किती महत्वाचेंं व उपयुक्त आहे, आणि तेंं प्रगल्भ दशेप्रत आणण्यास आपणांला किती परिश्रम केले पाहिजेत, याविषयींं आज नव्यानेंंच येथेंं सांगितलेंं पाहिजे असेंं नाहींं. कारण, ती गोष्ट बहुश्रुत समाजास सर्व प्रकारेंं विदित असून, विद्वज्जनांस तर त्याचा प्रत्यहीं अनुभवच येत आहे.

 खरोखर, भाषा ही एक अपूर्व वस्तु होय; व ती तशी असल्याबद्दल आमचे पुराण आर्यपूर्वज पूर्णपणेंं जाणून होते. शिवाय, ती गोष्ट आमच्या संस्कृत ग्रंथोदधीवरून देखील कोणाच्याही लक्षांत सहजीं येण्यासारखी आहे. (पुढील भाग ५ वा पहा). आणि म्हणूनच त्या प्राक्का-