Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૪૪ | भाषाशास्त्र. त्यामुळे, त्यांचा आशिया आणि यूरोप खंडांत सुळसुलाट होऊन, त्यांनी ही दोन्ही खंडे अगदी दणाणून सोडिली. चिगिझखानानंतर, जगताई नांवाच्या त्याच्या मुलाने देतिचा विस्तार. खील बराच मुलूख जिंकला होता, व त्यामुळे त्याच्या राज्याचा विस्तार नीपर नदीपासून तो तहत थेंबा नदीपर्यंत, आणि तिच्याही पलीकडे किरगिज पठारापर्यंत असे. याप्रमाणे, मोगली लोक व त्यांची भाषा यांचा विस्तार दिवसानुदिवस अधिकाधिकच होत गेला. इतकेच नव्हे तर, कालान्तराने, त्यांच्या छत्राखाली थेट पूर्वेकडील चीन देशही आला, आणि तेथे त्यांनी युआन * यवन ? ) नांवाचे आपले घराणे स्थापित केले. तदनंतर ते पश्चिमेकडे वळले, व बगदाद, इकोनियम, मास्को, इत्यादि शहरे आपल्या ताब्यात घेऊन, त्यानी रशियाचा बराच भाग उध्वस्त केला. पुढे, इ. स. १२४० साली, त्यांनी पोलंडकडे आपला मोर्चा फिरविला, आणि इ. स. १२४१ साली सिलेशिया घेऊन, थोड्या अवधीत मोरेव्हिया, हंगारी, जर्मनी, पोलंड, इत्यादि देश सर केले. तात्पर्य, चीनपासून पोलंड पावेतों, व हिंदुस्थानपासून सैबीरियापर्यंत, मोगली लोकांनी आपल्या राज्याचा अफाट विस्तार केला. तथापि, योग्य नियन्ता नसल्यामुळे, तेराव्या शतकाच्या | १ जगताई हे नांव जगताईने काबीज केलेल्या कांहीं प्रांतांस दिलेले असून, हा प्रदेश अरल सरोवरापासून तों हिंदकुशपर्यंत, व अक्षय्या आणि जगत्सरितू ( म्हणजे जिहून व सिहून ) या नद्यांच्या दरम्यान आहे. ह्याची प्राचीन राजधानी काराकोरम होय.