पान:भाषाशास्त्र.djvu/53

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ | भाषाशास्त्र. अर्थाचा बोध होता. मात्र, त्याचा अभिनिवेश योग्य रीतीने आणि जेथल्या तेथेच झाला पाहिजे. उदाहरणार्थ, गो तानी, या पदांचा अर्थ * मी तुला मारतो,' असा होते. परंतु, नी ती गो चा बोध * तू मला मारतोस, याशिवाय दुसरा होतच नाहीं. संश्लेष, किंवा प्रत्यय, हेच तुराणी भाषांचे मुख्य लक्षण तिचे लक्षण. होय. ज्याप्रमाणे आर्य व शमी कुटुंबांतील भाषांत शब्दांस विभक्ति लागते, त्याचप्रमाणे तुराणा भाषांत शब्दांस प्रत्यय लागतो. मात्र, भेद म्हणून इतकाच की, आर्य आणि शमी भाषांत, प्रायः मूळ धातूचे रूपान्तर होऊनच प्रत्यय लागतात. परंतु, तुराण भाषेत तसे न होता, हे प्रत्यय मूळ धातूसच, जोड अथवा सांध्याप्रमाणे लागले जातात. उदाहरणार्थ, संस्कृतांतील “कृ” या धातूस क्रियापदाचे प्रत्यय लागतांना, त्याचे रूप बदलते; पण तुर्की भाषेतील 4 बकर या धातूच्या मूळ रूपांत कांहीं एक फेरफार न होता, त्यालाच प्रत्यय प्रत्यक्ष जोडला जातो. जसे, संस्कृत. कृ=करणे. करोमि. कुर्वः. कुर्मः. प्रथम पुरुष | एकवचन, द्विवचन, अनेकवचन. । करोधि. कुरुथः. कुरुथ. द्वितीय पुरुष एकवचन, द्वि०, अ० करोति. कुरुतः कुर्वन्ति. तृतीय पुरुष एकवचन, द्वि० अ० तुक. बकर=मानणे. बकर-इम. मी मानतो. प्र० पु०ए०व० बकर-इझ. आम्ही मानतो. प्र०प०अ०व० बकर-सिन. तू मानतेस. द्वि०पु०ए०व०