पान:भाषाशास्त्र.djvu/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ सामान्यविवेचन व दिग्दर्शन. हुझवारिश अशी संज्ञा आहे, आणि तदितरांस पाझन्द म्हणतात. हुझवारिश म्हणजे व्यवहारातीत, व पाझन्द म्हणजे अर्थव्यंजक होय. जेव्हां इराणी भाषा आरबी हारफांत (वर्णत) लिहिण्यांत फारशी भाषा, येते, तेव्हा ती फारसी, हे अभिधान पावते. ह्याच भाषेत, फिरदूसी नामक फारशी कवीचे शहानामा नांवाचे, इ. स. १००० शतकांतलें सुप्रसिद्ध काव्य आहे; आणि ह्यांत आरबी शब्दांचा भरणा पुष्कळच कमी आहे. तथापि, मुसलमानी अमलाखालीच इराण गेल्याने, फारसी भाषेत आरबी शब्द दिवसानुदिवस ज्यास्त प्रमाणाने आपला शिरकाव करीत चालले, ही गोष्ट विसरतां कामा नये. | ३. ग्रीक अथवा हेलेनिक ही मृतभाषाच आहे; आणि डॉरिक, इलक, आयोनिक, व ग्रीक भाषेचे अटिक्, अशा ज्या तिच्या प्राचीन पोटभेद. काळच्या शाखा असत, त्या देखील सांप्रत व्यवहारांत नाहीत. मात्र, तिचे प्रस्तुत काळीं अन्य पोटभेद होऊन, ते हल्ली ग्रीस देशांत प्रचारांत आहेत. ४. ल्याटिन किंवा इतालिक ही देखील मृतभाषाच होय. हिच्या ऑस्कन् आणि अंल्याटिन भाषेचे ब्रियन अशा प्राक्कालीन शाखा असत. परंतु, त्यासुद्धां हल्ली प्रचारातीतच आहेत. तथापि, ह्या भाषेपासून अनेक पोटभेद झाले आहेत. व ते इटली, फ्रान्स, प्रोव्हेन्स, स्पेन, आणि पोर्चुगल, या देशांत फैलावले असून, ते त्या त्या देशांतील लोक बोलतात. पोटभेद.