पान:भाषाशास्त्र.djvu/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ | भाषाशास्त्र. करणे अवश्य आहे. हे टीकात्मक ग्रंथ, किंवा व्याख्यारूपी लेख, अगर तद्विषयक भाषान्तरे, ही बहुत करून पल्लवीत असतात. तथापि, क्वचित ती प्राचीन अविष्ट भाषेत देखील लिहिलेली असतील; आणि त्यामुळे, त्यांचा समावेश मूळ ग्रंथांत होऊन, ती केवळ संहिताच बनली, असे वाटते. सामान्यतः, मध्ययुगांत प्रचारात असलेल्या इराणी _ भाषेस पळवी ही संज्ञा आहे; व पल्लवी भाषेचे व्यावहारिकत्व. इसवी सनापूर्वी तिस-या शतकांतील नाण्यांवर, कित्येक पौराणिक कथानके ह्याच भाषेत लिहिल्याचे आढळून येते. तथापि, पल्लवी भाषेतील महत्वाचे दस्तैवज म्हटले म्हणजे, आरदेसर राजाच्या कारकीर्दीतील शिलालेख होत. हा राजा सासेनियन घराण्यांतला मूळपुरुष होता, व ह्याने इ. स. २२६ पासून २४० पर्यंत राज्य केले. पल्लवी भाषा इ. स. ९०० पर्यंत व्यावहारिक होती. त्यामुळे, ह्या कालानन्तरचे लेख बहुतकरून कूटरचना असण्याचा संभव आहे. पल्लवी भाषेचे नांव पार्थराजांच्या कारकीर्दीत तिला प्राप्त झाले, अशी कित्येकांची समजूत आहे. पल्लवी भाषेत अन्य परंत. ह्या म्हणण्याला कांहीं विशेष शब्द. बलवत्तर प्रमाण असल्याचे दिसून येत नाही. मात्र, इतकी गोष्ट खरी आहे की, ह्यांच्या वेळीच कित्यक शमीशब्द पल्लवी भाषेत घुसले. हे शमीशब्द सुमारे ४०० असून, पुरातन इराणींतले, म्हणजे झन्द भाषेतले शब्द अदमासे १०० आहेत. ह्या पांचशे शब्दांस पल्लवींत