पान:भाषाशास्त्र.djvu/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इरागाः ३० । भाषाशास्त्र. अर्थात्, ती ब्राह्मणांची कूटरचना नव्हे; अथवा, त्यांनी तिच्यांत कोणतेही बनावट लेख, केव्हां देखील लिहिलेले नाहीत; अशी आतां तरी पाश्चात्यांची खात्री होईल, एवढी आम्ही आशा करतो. २. इराणींत, झन्द व पल्लवी. यांचा समावेश होत असून, ह्या दोन्ही भाषा हल्ली प्रचापाटभद. रांत नाहींत. तथापि, ह्यांच्या ऐवजी, फारशी, अफगाणी, वलुची, पखतु अथवा पुष्टु, काँकेससमधली ऑसेशियर, कुरदिस्थानी, आणि आमनियन् भाषा व त्यांचे पाटभेद, इत्यादि व्यवहारांत आहेत, व ते इराण, अफगाणिस्थान, बलुचिस्थान, आर्मीनिया, इत्यादि देशांतले लोक बोलतात, झन्द शब्द हा संस्कृत छन्दस् शब्दाचा अपभ्रंश असल्याविषयी आम्ही पूर्वीच सांगितवा भाषा• लें असन, इन्द भाषेच्या संबंधार्ने । देखील आम्हों अवश्य ते दिगदर्शन केले आहे. सबब, आतां पल्लवी भाषेकडे आपण क्षणभर वळं, आणि तिच्याबद्दलचा अवश्य ती हकीकत येथे देऊ. ह्या भाषेच्यासंबंधाने, अनेक विद्वानांचे नाना त-हेचे | १ पुष्टु व भरतखंडांतील भाषा, यांच्यांत विशेष साम्य असल्याविपची टूम्पने सप्रमाण दाखविले आहे. ( Journal. German Oriental Society. vols. XXI. XXII. Trumpp's Grammar of Pushtu. 1873. ) २ बोरवारी भाषा इराणीचा पोटभेदच असल्याविषयी मॉक्समुलरचे मत आहे.