पान:भाषाशास्त्र.djvu/382

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ३७३ चेतच ते आपला सर्व व्यवहार उरकून घेत; आणि अशा प्रकारच्या एकाक्षरी मंत्रांतूनच आई भाषेचा सांप्रतचा प्रचंड आघ, तिची आश्चर्यकारक रमणीयता, तिची सर्वांगीं चारुता, तिचे पदलालित्य, तिचे गांभीर्य, तिचें माधुर्य, आणि तिची प्रौढता, यांचा केवळ अपूर्व उद्भव झाला आहे. आतां, आर्यभाषेची ह्मणजे संस्कृतची प्रथमची निव्वळ मुग्धावस्थाच असून, ती फक्त शनैः शनैः व कालान्तरानेच रूपवती होऊन मनोहर बनली; आणि शेवटी शेवटी तर ती अगदी पूर्ण दशे प्रत पावन लावण्याची निव्वळ खाणच झाली; हे जरी अक्षरशः खरे आहे, तरी आमचे आर्यपूर्वज हे फक्त एकाक्षरी भाषेतच बोलत, व एकाक्षरी शब्दांनीच आपला सर्व कारभार चालवीत असत, इयादि व्हिटनेचे प्रतिपादन सत्यापासून फारच दूर असल्यामुळे, ते आह्मांस ग्राह्य वाटत नाही. इतकेच नव्हे तर, ते बिलकुल शक्यच नाही, असे देखील कोणालाही कबूल केले पाहिजे. कारण, समाजाच्या प्रथमच्या आणि बाल्यावस्थेतील ह्या एकाक्षरी कोषाची कल्पना केवळ असंभवनीयच 9 « And the recognition of them in this character is an acknowlegement that Indo-European lan, guage, with all its fulness and inflective suppleness is descended fiom an original monosillabic tongue; that our ancestors talked with one another in single syllables, indicative of the ideas of prime importance, but wanting all designation of their relations, '; ( Whitney's Language and its Study. P. 25 6. ) ३ ३ ।