व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ૩૭૨ असे बुन्सेनादि’ पंडितास वाटते. तथापि, कित्येके असेही म्हणतात की, त्यांची संख्या २,०३० पर्यंत आहे. चिनी भाषेतील बादशाही कोषांत ४२,७१८ शब्द असल्याचे कळते. तथापि, ह्या संख्येच्या चौथाई हिश्यांत अगदी व्यवहारातीतच शब्द असून, राहिलेल्या अध्र्या भागांत । केवळ प्रसंगवशात मात्र येणारे शब्द आहेत. त्यामुळे, बाकीच्या चवथाईत, किंवा सुमारे १५००० शब्दांतच, चिनी लोकांचा नेहेमींचा व्यवहार चालता, असे म्हणण्यास हरकत नाही. असो. येथपर्यंत प्रातिपदिकांचा अवश्य तो विचार झाला, व ती धातूपासून उद्भवली किंवा स्वयंसिद्ध आहेत, याविषयी पौरस्त्य मताचे सामान्य दिगदर्शन केले. त्याचप्रमाणे, अनेक भाषांतील धातू व शब्द, याबद्दलचाही त्रोटक वृत्तान्त वाचकापुढे ठेविला. सबब, आतां, ह्या बाबतीत, ह्मणजे व्युत्पत्तिविषयक पाश्चात्यमत कशा प्रकारचे आहे ते पाहून, त्यासंबंधाची सविस्तर हकीकत देऊ. पाश्चात्य देशांत, किंबहुना यूरोप आणि अमेरिका खंडांत, व्युत्पत्तिवादाचे बरेच प्राबल्य पाश्चात्य देशांतील , असल्याचे दिसते; व जरी कित्येक व्युत्पतिवाद. विद्वान ह्या पक्षाला मिळते नाहीत, तरी * नामच धातुजमाह, ह्या पाठाचाच बहुतेक भाषापंडितानी अंगिकार केल्याचे उघड होते. १ Bunsel's Egypt. P. P. 453-91. २ Sharpe's Egyptian Hieroglyphics. 1861,
पान:भाषाशास्त्र.djvu/380
Appearance