Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/379

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७० भाषाशास्त्र. पाश्चात्य पंडित सांगतात; आणि चिनी भाषेत सुमारे ५०० धातू आहेत, असे तद्भाषाभिज्ञ ह्मणतात. एड्किन्सचे' असे मत आहे की, हे धातू ५३२ आहेत. परंतु, मॉरिस हा, ते ४११ असल्याचे सांगतो. जुन्या करारांत, हीब्यू व चाल्डी शब्दांची एकुण संख्या ५,६४२ असल्याविषय लुसडेनने आपला अभिप्राय दिला आहे; व गाँथिक भाषेचे सुमारे ६०० मूळधातू, आणि प्रस्तुत जर्मन भाषेचे अजमासे २९० धातू आहेत, म्हणून बेनलने लिहिले आहे. पाँट्च्या मते प्रत्येक भाषेचे सुमारे १,००० ज धातू असावेत. परंतु, डाँक्रोस्की हा स्लॉव्हिक शाखेतील भाघांचे १,६०९ धातू असल्याचे लिहितो; व ग्रिम हा टयूटाँनक शाखेची ४६२ क्रियापदे आहेत, म्हणून प्रतिपादन करते. वेबस्टरच्या कोशावरून, इंग्रजी भाषेत अजमासे ७०,००० शब्द असल्याचे दिसून येते; आणि ही संख्या १,००,००० जवळ जवळ जाईल असे मार्ग म्हणतो. इराणी भाषेतील कलाकृतिशिला लेखावरून, त्या भाषेत सुमारे ३७९ पेक्षा ज्यास्त शब्द असतील, असे वाटत नाही. इतकेच नव्हे तर, ह्यापैकी, १३१ तर विशेष नामच असल्यामुळे, फक्त २४८ शब्दच कायते, सामान्य नामें, क्रियापदे, आणि अन्य प्रातिपदिके, यांचे वाचक आहेत, असे म्हणावे लागते. मिसर देशांतल्या शराकृति लिपीवरून, त्या भाषेत सुमारे ६५० शब्दच असावेत, १ रिनान्रुत शमीभाषेचा इतिहास. पान १३८. २ Edkin's Mondartat Grammar. P. P. 44-45. * Pott. Etvnt. Forsch. II. 5. 73.