व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ३६९ प्रातिपदिकावरून होणा-या चरम प्रत्ययास विर्भक्ति ह्मणतात; धातूवरून जे चरम प्रत्यय "कारकें. होतात, त्यांस आख्याते अशी संज्ञा आहे; हे आख्यात-प्रत्यय धातूस लागल्यानंतर जे रूप होते, ते क्रियापद होय; आणि नामाचा क्रियेशीं, व वा. क्यांतील इतर शब्दाशी जो संबंध असतो, त्याला कारक ह्मणावयाचे. ही कारके खाली लिहिल्याप्रमाणे सहा प्रकारची असल्याविषयी पाणिनीचे मत आहे. १ कत, २ कर्म, ३ करण, ४ संप्रदान, ५ अपादान, आणि ६ अधिकरण. संस्कृत भाषेत एकंदर धातू १७०६ असल्याचे संस्कृत . वैयाकरणांनी ठरविले आहे; ह्यापैकीं, भिन्नन्निन्न भाषां या- १, ४, ६, व १०, या चार गणांचे तील धातू व शब्द. १४८० धातू असून, २, ३, ६, ७, ८, व ९, या सहा गणांचे २२६ धातू असल्याविषय, शोधक विद्वान ह्मणतात. अर्थात् , ह्या एकंदर संख्येतच दहाव्या गणांतील १४३ धातूंचाही समावेश होतो, आणि ह्याखेरीज इतर प्रातिपदिके आहेतच, असे सम. जावयाचे. शमी भाषेत सुमारे ९०० धातू असल्याचे
- १ ज्यावरून दुसरे प्रत्यय होत नाहीत, ते चरम प्रत्यय होत.
२ मराठीत चतुर्थी विभक्ति मुळीच नाहीं; व पष्टी विभक्ति जिला ह्मणतात, त्या प्रत्ययास विभक्तित्व मानण्यास अनेक अडचणी येतात. यासाठी, मराठी भाषेत फक्त पांच विभक्तीच मानात्या. असा कृष्णशास्त्री चिपळुणकर यांचा अभिप्राय आहे. ( मराठी व्याकरणावरील निबंध. ) ; बेनुफे. ( Benfey. Kuze Grammatitle. 151. )