पान:भाषाशास्त्र.djvu/370

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ३६१ लागून, त्यापासूनच साधित विशेषणे, आणि क्रियाविशेषणअव्यये होतात. उदाहरणार्थ, कोणता, पुढील, एव्हां, कोठे, एरवीं, इत्यादि. चा हा प्रत्यय तद्विताचाच असून, त्यासंबंधाने कित्येक वैयाकरणांचे असे मत आहे की, हा प्रत्यय, संस्कृत भाषेतल्या षष्ठीविभक्तीचा प्रत्यय जो ‘स्य', त्याचाच अनुवाद होय. तथापि, कांहींस ही गोष्ट बिलकुल संमत नाही. कारण, ते असे प्रतिपादन करतात की, संस्कृतांतील षष्ठीची चतुर्थी फक्त प्राकृतांतच झाली असून, पाली आणि प्राकृत भाषांत चतुर्थीचा लोपच आहे. इतकेंच नव्हे तर, षष्ठीचा तिच्याऐवजी उपयोग करावा, असे त्या भाषांच्या व्याकरणांत सुद्धा स्पष्टपणे सांगितले आहे. शिवाय, संस्कृत भाषेतील कोणताही विभक्ति प्रत्यय लिंगाप्रमाणे फिरत नसून, मराठींतले चा, ची, चे, हे प्रत्यय फिरतात; व तद्वटित शब्दांस सामान्यरूपहीं होतें. सबब, हा प्रत्यय कोणत्या तरी विशेष प्रत्ययावरून झाला आहे, असे मानणे सयुक्तिक दिसते. इल, ला, हे तहत प्रत्यय बहुतेक अव्ययापासून वि- सर्व शब्दयोगी अव्ययास लागन, शेषणे त्यांचीं साधित विशेषणे होतात. जसे, वरील, आंतला, इत्यादि. व्हा प्रत्ययाने कालाचा बोध होतो. ह्मणून, मी व ते खेरीज करून, बाकीच्या यच्चावत् सर्वनामांपासूस क्रि सर्वनामांपुढे हा प्रत्यय लागून त्यायाविशेषण अव्यये. पासून साधित क्रियाविशेषण अव्ययें होतात. उदाहरणार्थ, जमें, केव्हां, एव्हां, वगैरे. १ चतुथ्यः षष्टी ।। ६ ।। ( प्रारुतप्रकाश. परिच्छद सहावा. ) ३१