पान:भाषाशास्त्र.djvu/369

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६० भाषाशास्त्र. कित्येक प्रत्यय प्रकृतीस लागतात, व त्यामुळेच त्यांचे || प्रत्ययांचे भेद व यौगिक शब्द बनतात. अशा प्रका. यौगिक शब्दांची र- रच्या प्रत्ययांचे दोन भेद आहेत। चना. १ धातूवरून होणारे प्रत्यय; आणि २ धातृहून भिन्न असे जे शब्द ह्मणजे प्रातिपदिकें व अव्ययें, त्यावरून होणारे प्रत्यय. पहिल्या प्रत्ययांस संस्कृतांत कृत अशी संज्ञा असून, दुसन्यांस तद्धित ह्मणतात. जसे १ जेवून, करून, लिहून, जाणे, गाणे; २ लोखंडी, लांकडी, पितळी ( देव्हारा ), बाईल, गुळचट; इत्यादि. पहले ऊन, णे, वगैरे कृत् प्रत्ययाचे उदाहरण होय; व दुसरे ई, ईल, हें तद्धिताचे समजावयाचे. परंतु, अमक्या प्रकारच्या धातूस, अमुक अर्थी, आणि अमक्या प्रकाराने, हे प्रत्यय प्रकृतीस लागतात, अशा विषयीं कांहीं एक नियम बांधता येत नाही. मात्र, हे प्रत्यय प्रकृतीस लागतांना, तिला क्वाचित कांहीं विकार घडतात, हे लक्षात ठेविले पाहिजे. संस्कृतांत कृत्वा, दवा, इत्यादींत जो * त्वा ' प्रत्यय दृग्गोचर होतो, त्याचाच बाल भाषेत “ तृण' असा अपभ्रंश होऊन, त्यापासूनच मराठीतला ' ऊन ' प्रत्यय झाला आहे. आम्ही पूर्वी सांगितलेच आहे की, प्रातिपदिकांस किंवा । अव्ययांस प्रत्यय लागून कांहीं शब्द सितद्वित प्रत्यय, व त्यापासून होणारी क्रि- ६ हातात. ह्या प्रत्ययांस तद्धित प्रत्यय याविशेषणे आणि अ- अशी संज्ञा आहे. ह्या तद्धित प्रत्ययांत । व्ययें. | कित्येक फारच महत्वाचे आहेत. का| रण, ते सर्वनामांस व प्रायः सर्व शब्दयोगी अव्ययांस