Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/371

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६२ भाषाशास्त्र. थे हा प्रत्यय स्थलवाचक असून, तो एकंदर सर्वनामांपुढे लागतो, व त्यापासून साधित क्रियाविशेषण अव्ययें होतात. उदाहरणार्थ, जेथे, तेथे, येथे, इत्यादि. कोण शब्दांस हा प्रत्यय लागतांना, थकारास ठकाराचा आदेश होऊन, त्याचे कोठं हे रूप होते. त्याचप्रमाणे, एव्हां आणि एथे, ही रूपें हा या सर्वनामापासूनच झालेली हेात. असो. आतां, यौगिक शब्दाचा राहिलेला भेद जो समास, त्याविषयी मात्र दोन शब्द लिहावयाचे राहिले आहेत. यासाठी, तत्संबंधीं अवश्य ते दिग्दर्शन येथे थोडक्यांतच करितो. परस्परांच्या संदर्भाने युक्त असून, अनेक शब्दांतील संब धदर्शक असा जो एक शब्द होतो, समासाची व्याख्या, अथवा सर्वनाम, अव्यय, विभक्ति, व प्रत्यय, यांचा लोप होऊन, अनेक शब्दांचा विशिष्टार्थवाचक जो एक शब्द बनतो, त्याला समास म्हणतात. अर्थात्, पदांतील अनावश्यक विभक्ति, सर्वनामें, अव्यये, इत्यादींचा लोप झाल्यानंतर, जी विशिष्टार्थक आणि सिद्ध झालेली प्रातिपदिके राहतात, त्यांसच समास अशी संज्ञा आहे. संस्कृत भाषेत हे समास नि:संशय फारच महत्वाचे असून, ते ह्या भाषेचे केवळ जवनच त्याचा उपयोग. | आहेत, असेही म्हणण्यास हरकत नाहीं. आणि त्यामुळेच, संस्कृत काव्यास, व विशेषेकरून गद्यास, विलक्षण साहाय्य होऊन, कठिण आणि तीव्र शब्दांच्या योगाने भाषेस जे कटुत्व यावयाचे, ते संधि व समासाचा