पान:भाषाशास्त्र.djvu/368

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ३५९ न होतां, फक्त हत्तीचा मात्र होतो. लोहार, तांबट, कासार, इत्यादि नानाविध कसबी हरत-हेची भांडी आणि चित्रवित्र कुंभ करीत असून देखील, त्यांस कुंभार किंवा कुंभकार ही संज्ञा नाही. तर ती फक्त मातीची भांडी घडविणारांसच आहे. अशाप्रकारचे शब्द योगरूढ होत, व ह्यांसच योगक _ शब्द, योगरूढशब्द, आणि साधिप्रत्यय व प्रकृति, तशब्द, अशी संज्ञा आहे. ह्याचे आणि उपसर्ग. प्रकृति व प्रत्यय, असे मुख्यत्वेकरून दोन अवयव आहेत. ज्या शब्दावयवाचा प्रयोग कधीही स्वातंत्र्याने होत नसन, ता केवळ दुस-या एखाद्या शब्दापुढेच होतो, त्यांस प्रत्यय म्हणतात. आणि ज्या मूळ शब्दापढे प्रत्यय होतो, त्यामूळशब्दास त्या प्रत्ययाची प्रकृति समजावयाची. जमें, शिवणावळ, जामीनकी, या शब्दांत शिंव, जामीन, हे मूळशब्द प्रकृति होत; व * णावळ' , ' की, ' या शब्दांस प्रत्यय म्हणावें. यौगिकशब्दांत, कधी कधी तिसरा अवयवही आढळून येतो, व त्यास उपसर्ग अशी संज्ञा आहे. उदाहरणार्थ, प्रकृति, निश्चय, या शब्दांत, प्र आणि निस् , हे उपसर्ग समजावयाचे. आतां, है। उपसर्ग संस्कृत भाषेत ज्याप्रमाणे विशेष आढळतात, त्याप्रमाणे प्राकृत भाषेत जरी दृग्गोचर होत नाहीत तरी, उठणे ( उत्थापनम् ), वोसरणे ( अपसरणम् ), निघणे ( निर्गतिः ), ओढणे : ( अपकणम् ), पाझळणे ( प्रज्वलनम् ) आंखडणे ( आकुंचनम् ), बिघडणे ( विघटनम् ), वगैरे अपभ्रष्ट झालेले प्राकृत शब्द, ह्या उपसर्गाचीच उदाहरणे आहेत, असे म्हणण्यास हरकत नाहीं.