पान:भाषाशास्त्र.djvu/367

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५८ भाषाशास्त्र अर्थ सर्पटणारा प्राणी इतकाच होता. आता, असे सर्पटणारे प्राणी अनेक जातीचे आहेत, व त्यांत कित्येक विषारी आणि कांहीं अविषारी, यांचा देखील समावेश होण्यास हरकत नाही. फार तर काय सांगावे, पण, ह्या शब्दाच्या धात्वर्थाकडे पाहिले म्हणजे, यांत गांडवळांसारख्या निरुपद्रवी प्राण्यांचा समावेश करण्यालाही कोणतीच हरकत नाही, असे म्हटले असतां चालेल. परंतु, वस्तुस्थिति तशी नसून, ती याहून उलट व अगदी भिन्न आहे. आणि म्हणूनच सर्प किंवा साप म्हणजे गांडवळ नसून, तो सर्पटणारा व दंश करणारा विषारी प्राणी, असाच त्याचा व्यावहारिक अर्थ समजण्यांत येते. हा शब्द ल्याटिन ( सर्पो ), व इंग्रजी (सर्पेट ) भाषेत सुद्धा ह्याच अर्थाचा द्योतक आहे. अशाच मासल्याचे तुरंग, फणी, दांत, कुंभार, इत्यादि शब्द होत. ह्यांच्या धात्वथाकडे पाहिले असता, हे शब्द फारच व्यापकसे वाटतात. तथापि, त्यांची योजना मात्र केवळ संकुचित असून, फक्त विवक्षत वस्तूचा बेध व्हावा, म्हणूनच त्यांचा उपयोग केलेला दिसतो. तुरंगाचा धात्वर्थ फारच व्यापक आहे, आणि फक्त त्यावरूनच (तुरंगच्छतति तुरंगः, म्हणजे) जलदी चालणारा प्राणी, असा बोध होतो. परंतु, जलदी चालणारे प्राणी असंख्य असूनही, ह्या शब्दाची योजना फक्त व्यक्तिविशेषाकडेच केली असल्यामुळे, त्याचा अर्थ घोडा असाच समजण्यांत येतो. फण्या निवडुंगाला फणा असतांही, फणी शब्द त्या वनस्पतीचा वाचक नसून, ते सर्पाचाच वाचक आहे. मनुष्य, जनावरे, व इतर प्राणी यांस दांत असतांही, दंती शब्दाने त्यापैकी कोणाचाच बोध