Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/366

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्याख्या. व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ३५७ त्याने व्याख्याही दिली आहे. त्यावप्रातिपदिकाची । | रून, जो शब्द अर्थावबोधक आहे; अथवा, जो, धातु ( ह्मणजे प्रकृति ) व प्रत्यय, यांच्या संयोगाने होत नसून, स्वयमेवासिद्ध असतो; अगर जो कृत् किंवा तद्धित प्रत्ययाने, अथग समासाच्या योगाने बनतो; त्यालाच प्रातिपदिक अशी संज्ञा असल्याचे दिसते. । अर्थवदधातुरप्रत्ययः प्रातिपदिकम् ।। कृत्तद्धितसमासाश्च । ( पाणिन. ) प्रातिपादक विशेष्य असल्यास ते नाम समजावे. परंतु, | जर ते गौणार्थी असून, विशेष्यावर सिद्ध आणि साधि- अवलंबून राहील, तर ते विशेषण त शब्द. । होय. प्रातिपदिकांतील कित्येक शब्द केवळ रूढीनेच प्रचारांत आलेले असतात. सबब, त्यांस रूढशब्द किंवा सिद्धशब्द म्हणतात. उदाहरणार्थ झाड, धोंडा, इत्यादि. तथापि, त्यांत कांहीं कांहीं शब्द असेही आढळून येतात की, त्यांचा अर्थ फक्त तङ्घटकावयवाच्या सान्निध्यानेच उत्पन्न होतो. अशा शब्दांस योगकशब्द अथवा साधितशब्द अशी संज्ञा आहे; जसे लोहार, विणणार, वगैरे. आतां, अशा प्रकारच्या शब्दांत, त्यांचा यौगिक अर्थ फारच व्यापक असतो. तथापि, त्यांची योजना मात्र कित्येक व्यापक केवळ मर्यादित व संकुचित असन, शब्दांचा मर्यादित ती फक्त विवक्षित व्यक्तीसाठीच झा ल्याचे उघड दिसते. अशा प्रकारच्या शब्दांस य गरूढशब्द म्हणतात. उदाहरणार्थ, सर्प किंवा साप शब्द सृष् धातूपासून झाला आहे, आणि त्याचा मूळ अर्थ.