पान:भाषाशास्त्र.djvu/349

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४० भाषाशास्त्र, याप्रमाणे व्याकरणशास्त्राचा उदय होत गेल्याने, शब्दहीबयचे नसते मह. व्युत्पत्तीला सहजींच अवकाश मिळाला; त्व, व धर्मपिशाने झा- आणि सीरियाक व आरबी शब्दांची लेला घोंटाळा. तुलना झाल्याने, शमीकुळांतील मूळ शब्द कोणता, हे शोधून काढण्याचे कुतूहल आपोआपच वाढत गेलें, पुढे, सादिया (इ. स. ९४२ ), मिनाहेम ( इ. स. ९६ ० ), दुनाश (इ. स. ९७० ), जूडाखय्युग। ( इ. स. ९७० ), इत्यादि अनेक ज्यु वैयाकरण झाले, व यांनी शब्दव्युत्पत्तिविषयक सामान्य परिश्रम केले. तदनन्तर, ३. स १२०० साली, हीब्यू भाषेसंबंधी आणखी थोडीशी चळवळ सुरू झाली. परंतु, तींत शब्दव्युत्पत्ति किंवा भाषाशास्त्र यांजकडे विशेष लक्ष्य पुरविण्याविषयी कोणाच्याही मनांत न येतां, धर्माचेच घोंगडे पुढे सरले. त्यामुळे, ह्या हालचालीचा व्हावा तसा उपयोग झाला नाही. इतकेंच नव्हे तर, ज्यू धमाचे आणि हीब्यू भाषेचे वाजवीपेक्षा फाजिल व निष्कारण महत्व वाढून, त्याचा निव्वळ देव्हाराच माजला. असत्याची सरशी होऊन, सत्याचा लोप होत चालला. ज्ञानाला ग्रहण लागून, अज्ञानाची पोळी पिकली. दुराग्रह वाढून, स्वमतमंडनाला अवकाश मिळाला. आणि त्याचा साक्षात परंतु विघातक परिणाम असा झाला की, धर्माभिमानाची तीव्र ज्वाला सर्व यूरोपखंडभर पसरून, या पंडितमन्यांनी हीब्यू बोलालाच अखिल जगाची मायभाषा ठरविली; व ती ईश्वरानेच निर्माण केली, म्हणून ते उघडपणे प्रतिपादन करू लागले. फार तर काय सांगावे पण, ग्रीक, ल्याटिन्, फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, इत्यादि नानाविध