पान:भाषाशास्त्र.djvu/348

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३३९ सुरू झाला; आणि या योगाने सीरियन् ख्रिस्ती लोकांत विद्याभिरुचि वाढून, एक लहानसे व्याकरण सुद्धा तयार झाले. पुढे, इ. स. ६५०-७०० च्या सुमारास, कोणी एक जेकबनें त्यांत सुधारणा केली, व त्यावरूनच त्या भाषेतील दुसरी सर्व व्याकरणे तयार झाली. मात्र, जेकबू मजकूरने देखील ग्रीक पद्धतीचेच अनुकरण केले होते, ही गोष्ट विसरता कामा नये. त्यानंतर, अकराव्या शतकांत निसिविस्चा राहणार ईलियस् नामक व्याकरणकार होऊन गेला; आणि त्याच्या मागून इ. स. च्या तेराव्या शतकांत, जाँनबरझुगबी नांवाचा वैयाकरण झाला. सिरिक भाषेचे व्याकरण परिपूर्णतेस आणणारा हा पहिलाच व्याकरणकार होय, असे रीनानचे मत आहे. सीरियाची हालचाल पाहून, आरबी लोकांसही स्फुरण आले, व इ. स. घ्या सातव्या शतआरबस्थानातील कांत, आबुल आस्वेदने व्याकरण हालचाल. विषयक लहान लहान आणि अगदी त्रोटक ग्रंथ लिहले. आबुल हा इ. स. ६८८ साली मरण पावला. तथापि, त्याने सुरू केलेला प्रयत्न बंद न पडतां । तो बसरा व क्यूफा येथील पाठशाळांत तसाच चालू राहिला; व सिबावायचे व्याकरण हे ह्याच श्रमसातत्याचे फल होय. हा आरवी वैयाकरण इ. स. ७७० साली उद्यास आला, आणि म्हणूनच ते पुराण व्याकरणकारांत मोडता, ह्याच्या नंतर बरेच वैयाकरण झाले, व पंधराव्या शतकांत, त्यांची एकंदर संख्या २,५०० पर्यंत होऊन गेल्याचे सांगतात. १ Histoire des Langues semitiques. P. 272.)