३२९ भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. करतात. गोरोपियसने तर इ. स. १९८० साली, ऑण्टवर्प येथे एक स्वतंत्र लेखच छापला, व त्यांत, डच ही नन्दनवनांतील व्यावहारिक भाषा होती, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. अॅण्डी केम्पने * नन्दनवनाची भाषा नामक पुस्तकांत, असे चमत्कारिक आणि हसू येण्यासारखे विधान केले आहे की, ईश्वर हा आदामजवळ स्वीडिश भाषेत बोलला; तदनंतर, आदामने आकाशांतल्या बापाला डॉनिश भाषेत उत्तर दिले; व सपने ईव्हशीं फ्रेंच भाषेत संभाषण केले. इ. स. १८३८ सालीं, बोड येथे प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांत, एका विद्वत् परिषदेने अशाच मासल्याचा पण याहून भिन्न तहेचा सिद्धान्त ठोकून दिला आहे; आणि त्यावरून असे दिसते की, बास्क हीच आदाम व ईव्हची नन्दनवनांतील भाषा होती. ( मागील पृष्ठावरून पुढे चालू. ) सदरह अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. परंतु, त्यां. वरुन, कित्येक पाश्चात्य विद्वानांचें बालिश मत, त्यांची कोती समजत, आणि त्यांचा नितान्त दुराग्रह, इत्यादि गोष्टी चांगल्या रीतीनें व्यक्त होतील. ( ग्रंथकर्ता.) प्रोफेसर मॉक्समुलर म्हणतो, * Guichard went so far as to maintain, that as Hebrew was written from right to left, and Greek from left to right, Greek words might be traced back to Hebrew by being simply_read from right to left. " ( Lectures. Science of Lauguage. vol. I. From left to rig by being simpy Lauguage. vol. I. P. 148. Note 23. ) १ Vide Hennequin, Essai Surl' Analogic des Langues. Bordeaux1838. P. 60.
पान:भाषाशास्त्र.djvu/338
Appearance