३२८ भाषाशास्त्र, सत्यान्वेषणावरच अवलंबून असतात. आणि म्हणूनच, ह्या सत्यसूर्यावर जेव्हा जेव्हां दुराग्रहाचे पटल येते, तेव्हां तेव्हां त्याला आपोआपच ग्रहण लागून, त्याचा निव्वळ खग्रासच होतो. इतकेच नव्हे तर, शोधाचे मूळ जळून जाते, व त्याचा पाया एकदम खचतो. यासाठी, प्रत्येक शास्त्रीय विषयांत आपण हंसवृत्तीचे अवलंबन केले पाहिजे. आणि ज्यात्यान्वेषण व है- प्रमाणे पयोनीरमिश्रणांतन हंस हा सवृत्ति. | फक्त क्षीराचाच अंगिकार करतो, त्याचप्रमाणे शास्त्रीय शोधांत सत्याचे ग्रहण करून, असत्याचा त्याग करणेच अत्यवश्य आहे. दुराग्रह म्हणजे असत्याचा पाया होय. सबब, सत्यान्वेषणार्थ, हरएक सुज्ञ मनुष्याने दुराग्रह हा अजिबात सोडूनच दिला पाहिजे. आतां, अशा प्रकारचा दुराग्रह, अज्ञान, असमंजस, व टीव-य भाषेसंबंधी अशिक्षित लोकांनी केला, तर त्यांत मिथ्या कल्पना व दु- नवलच नाही. पण, सूज्ञ, पंडित, राग्रह. | आणि शोधक मंडळींतही अशाच मासल्याची उदाहरणे दिसून येतात, हेच मोठे आश्चर्य होय. हीब्यू ही अखिल जगाची मायभाषा असल्या. बद्दल गिचर्ड व थोमॉसिन् सारखे विद्वान लोक प्रतिपादन 1• As Hebrew is undoubtedly the mother of all lauguages, how are we to explain the process by which Hebrew became split into so many dialects; and how can these numerous dialects, such as Greek and Latin, Coptic, Persian, Turkish, be truced backs to the counuora. Source, the Hebrew : ( पुढे चालू. ) .
पान:भाषाशास्त्र.djvu/337
Appearance