पान:भाषाशास्त्र.djvu/332

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३२३ एकही ग्रंथ केला असल्याचे ऐकिवात नसून, तसा दाखलाही मिळत नाही. लूशियस सुद्धा ग्रंथकारच होता, व त्याने आपल्या आक्षेपकाव्यांतील नवव्या पुस्तकांत, वर्णविन्यासाची सुधारणा व्हावी, याबद्दलचा विचार केला आहे. पण, याहीपेक्षां विशेष आश्चर्य करण्यासारखा ग्रंथ ह्मटला म्हणजे, सीझरचे ल्याटिन् भाषेतील व्याकरण होय. हे व्याकरण सीझरने ग्यालिक युद्धांत व्यग्र असतां लिहिले. त्यावरून त्याचा विद्याविनोद, त्याची अध्ययनपरायणता, आणि त्याचे चित्तैकीकरण, ही चांगल्या रीतीने व्यक्त होतात. . तथापि, इतके झाले तरी, भाषाशास्त्राचे खरे परिशीलन होण्याला अद्यापि सुरवात झाली नव्हती, असे म्हणण्यास हरकत नाही. मात्र, नाना प्रकारची भाषान्तरे झाल्याने, विद्येची अभिवृद्धि होत गेली; व त्या योगाने, धातूची रूपं, नामें, क्रियापदे, इत्यादिकांची जिज्ञासा सहजीच होऊ लागली. असे. ह्याच सुमारास, पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे, डायो डायोनिशियसचे निशियस् अॅक्सचे ग्रीक भाषेतील मलव्याकरण,व त्यानं- मूलव्याकरण रोम शहरात प्रसिद्ध झाले. तरचे वैयाकरण. आतां, डायोनिशियसची ही कृति म्हटली म्हणजे, व्याकरणाचा पाया व त्याची परिसमाप्तीच समजावयाची. कारण, ह्याच्या नन्तरच्या वैयाकरणांनी त्यांत नूतन कांहीं एक घातले नसून, अन्य तव्हेची कल्प. कताही चालविला असल्याचे दिसत नाही. मात्र, त्यांत १ ह्याचे नांव डी. ऑनॉलजिया ( De Analagia ), असे आहे.