રૂર भाषाशास्त्र. कचित् कोणी सुधारणा करून, प्रसंगोपात न्यूनाधिक्यही केले, यांत संशय नाहीं. व्हेरियस फॉकस आणि किंटि. लियन्, हे इ. स. च्या पहिल्या शतकांतले वैयाकरण होत. स्कॉरस, आपोलोनियस, डिस्कोलम, व त्याचा मुलग हिरोडियानस, हे दुस-या शतकांत होऊन गेले; आणि प्रोबस व डोनेटस हे चवथ्यांत झाले. पुढे, रोमच्या राज्यांत बरीच धामधूम उडून, रोम येथून राजधानीचे ठिकाण उठले, आणि ते कुस्तन्तुनिया येथे गेले. त्यावेळी, तेथे ग्रीक व लॉटिन या दोन्ही भाषा मिळून, एकंदर वीस वैयाकरण होते. सहाव्या शतकांत, प्रिसियानस प्रसिद्धीस आला, आणि ह्याचे व्याकरण मध्ययुगांत, व हल्ली देखील कांहीं काळपर्यंत प्रमाणभूत मानीत. | * ग्रीकपासून ल्याटिनची उत्पात्त या नांवाचे पुस्तक डोनेटसने केले असून, प्रिसियानने त्याच धोर णाने, ग्रीक आणि ल्याटिन् भाषांतील साम्य दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रिसियानस्ची व्याकरणावर एकंदर अठरा पुस्तके असल्याचे सांगतात; व त्यावरून, त्यावेळी, व्याकरणविषयक बरीच अभिरुचि विद्वान मंडळीस लागली होती, असे वाटते. परंतु, हे सर्व ग्रंथ केवळ बाल्यावस्थेतच असून, ते केवळ निरुपयेागीच होते; आणि ही गोष्ट पाश्चात्य विद्वान व भाषापंडित, यांस देखील कबूल करणे भाग पडते. कारण, भाषाशास्त्राच्या दृष्टीने त्यांचा कांहींएक १ मॉक्समुलरची भाषाशास्त्रविषयक व्याख्याने ( १. १२३ ). २ Middle ages.
पान:भाषाशास्त्र.djvu/333
Appearance