ई ૨૨૨ भाषाशास्त्र. बनाव बनून, कित्येक गुणांबरोबर अनेक ग्रोकदोषांचे देखील रोमन् लोक यथेष्ट अनुकरण करू लागले. याप्रमाणे, सरकारांत व दरबारांत, जनी आणि विजन, घरीं व दारी, किंबहुना सर्वत्रच, ऑडिसाचे भाषा- ग्रीक भाषेचे प्राबल्य दिवसानुदिवस तर,व वैदग्ध्यशून्यता. । ज्यास्त वाढत चालले असतां, लिव्हियस अॅण्ड्रॉनिकसने इ. स. पू. २७२ च्या सुमारास, अँडसचे ल्याटिनांत पद्यात्मक भाषन्तर केले. हे इतके ग्राम्य, अरसिक, व अबडधोबड झाले होते की, त्याला कोणीही तेव्हांच नाक मुरडले असते. परंतु, असे असूनही, त्याची उत्कृष्ट ग्रंथांत गणना होई, आणि तत्कालीन पाश्चात्य लोक त्याला पूर्णतेची केवळ प्रतिमाच समजत. ह्यावरून, त्याचवेळेस रोमन् लोकांची व इतरांची अभिरुचिशून्यता आणि रसिकता भाव किती होता, हे वाचकाच्या ध्यानात सहज येईल. पुढे, इ. स. पू. १५९ च्या सुमाराम, क्रेटीज्ने रोम शहरांत व्याकरणावर ग्रीक भाषेत व्याकरणविषयक
- व्याख्यान देण्याचे सुरू केले, आणि ग्रंथ व व्याख्याने.
तेव्हापासूनच त्या लोकांस व्याकरणाची किंचित् गोडी लागली, असे ह्मणण्यास हरकत नाही. तदनंतर, लूशियम इलियस् स्टिलाने सुद्धा ल्या टिनु भाषेत व्याकरणविषयक व्याख्याने दिली व धातुविवेचक एक ग्रंथही लिहिला. व्हॉरो, लुसिलियस्, आणि सिसरो, हे त्याचेच शिष्ये होत. ह्यापैकी, व्हॉरोने ल्याटिन भाषेवर चोवीस पुस्तके लिहिली होती. सिसरोला देखील व्याकरणांत प्रमाणभूत मानतात. तथापि, त्याने