Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१४ भाषाशास्त्र. योजना झाली असावी, असे वाटते. कारण, बाल्यावस्थेत मुलांचा व्यवहार ज्या ज्या भाषांत चालतो, त्या त्या भाषा त्यांस अनायासेंच अवगत होतात. आमच्या महाराष्ट्र साम्राज्यांत, आमची ठाणी व आ | मच्या वसाहती भरतखंडांत चोहीकडे भाषाज्ञानाचा उ- चमकत होत्या. तसेच, हिमाचलापाय, हल्लीचा पासून तो तहत रामेश्वरापर्यंत, आणि अटकेपासून तो थेट ब्रह्मपुत्रानदीपावेतो, आमचा भगवा झेंडा अव्याहत फडकत असल्यामुळे, आम्हांला वारंवार सर्वत्र जावे लागे; व सामान्यतः आमचा लवाजमा, नोकरचाकर, इत्यादि तेथेच राहत. क्वचित् प्रसंगी, आमचे सगेसायरे सुद्धा त्याच ठिकाणी वस्ती करीत, आणि त्या त्या मुलखांचा कारभारही संभाळीत. त्याकारणाने, त्यांनला व त्यांच्या मुलांबाळांस, मराठी, गुजराथी, हिंदुस्थानी, फार्सी, कानडी, मल्याळी, इत्यादि अनेक भाषा येत. अशाच प्रकारे, इंग्रजांचेही दिसून येते. यांची मुले, ह्या देशांतील आया व दाया, यांजबरोबर असतात. त्यामुळे, त्यांजला त्यांची भाषा सहजच येते. आतां, ही भाषा बहुतकरून हिंदुस्थानी असते. तथापि, क्वचित् प्रसंगी ह्या दाया मल्याळी, कानडी, किंवा गुजराथी, वगैरे भिन्न भिन्न जातीच्या असल्यास, त्या भाषा देखील त्या मुलांस विशेष प्रयास न पडतां अवगत होतात. अशाच प्रकारची स्थिति प्राचीन काळी सुद्धा असल्याचे दिसते. कारण, मीडियाचा राजा शियाक्षरस याने देखील अशाच तव्हेची योजना केली असून, त्याच्या हद्दीत शक लोक आल्यावर, पूर्व काळचा.