पान:भाषाशास्त्र.djvu/322

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३१३ दुसरा परिणाम असा घडून आला की, आमच्या परि चयाने ग्रीक लोकांचा अज्ञानतम व ह्याने झालेले नाहीसा झाला; व त्यामुळे, ग्रीकेतर मतांतर. सर्व जनसमूह केवळ जंगलीच आहे, असा जो त्यांचा दृढ ग्रह होऊन गेला होता, त्यालासुद्धा फांटा मिळाला, आणि विरजण लागले. अर्थात्, त्यायोगाने, परकी भाषांचे हीनत्व जाऊन, त्या शिकण्याविषयींची इच्छा त्यांच्यांत उत्पन्न झाली. पण, ही इच्छा कोणत्या उपायांनीं । पार पडावी, एवढाच कायतो मोठा व बिकट प्रश्न राहिला. कारण, दुभाषांखेरीज ह्या भाषांचे ज्ञान होणे शक्य नव्हते; आणि दुभाषांची तर पोठी पंचाईत पडू लागली. तेव्हां, ही अडचण दूर होण्यासाठी, बहुतकरून प्रथमतः मुलांचीच १ ह्या जंगली शब्दाची किंमत पाश्चात्यर्देशांत फारशी, किंबहुना कांहींच असल्याचे दिसत नाही. कारण, ग्रीक लोक हे सुशिक्षित, अशिक्षित, इत्यादि झाडून सर्वांस, जंगली ( Barbarians ), अथवा हीनवादी ( Agglossoi ) म्हणत. पोललोक जर्मनलोकांस मुके ( Niemiec ) च समजतात. जर्मन लोकांनी सेल्टस लोकांस स्लिष्ट ( Wcuth in Old High German, Vecch in Anglo-Saxon ) असे नामधेय दिले होते. ह्याचेच Vels में सांप्रतचे रूप असून, त्याचा अर्थ अस्पष्ट किंवा अव्यक्त होतो इंग्रज लोक तर भारतीयासारख्या प्राक्कालीन सुधारणेच्या अगदी उच्च कोटीत पोहोचलेल्या लोकांस, ( म्हणजे अर्थात् आम्हां हिंदं न देखील, ) केवळ आमच्याकडे आतां प्रभुत्वाचे नाते राहिले नाही येवढ्याच कारणाने, जंगली, क्षुद्र ( NiggC00:0, ), इत्यादि उपपदे सर्रास्त व निर्भिडपणे देतात. आतां, ह्या सोंलीव आणि निवडक विशेपणांस आम्ही किती अंशाने पात्र आहोत, हे इतिहासज्ञांस तेव्हांच समजण्यासारखे आहे. सबब, तविषयक विवचन येथे करण्याचे प्रयोजन नाहीं. २७