पान:भाषाशास्त्र.djvu/321

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१२ भाषाशास्त्र. नाहीसा झाला. कारण, प्रथमतःच अश्रुतपूर्व असे आमचे ज्ञानभांडार त्यांजला समजले. तेणेकरून, आम्हां आयच्या ज्ञानाविषयी त्यांजला महदाश्चर्य वाटू लागले; तत्वज्ञानांत आमची पारंगता पाहून, त्यांचे कुतूहल वाढत चाललें; अनेक शाखांतील आमच्या शोधांनी त्यांस विस्मय झाला; नानाविध कलांतील आमचे नैपुण्य अवलोकन करून, त्यांजला मोठे समाधान वाटले; आणि आमचा अगाध संस्कृतोदधि पाहून तर, त्याचे मन अगदी चकितच होऊन गेले. अशा प्रकारची वस्तुस्थिति असल्यामुळे, ग्रीक शिवाय तिचा परिणाम, दुस-या देखील अनेक भाषा, परिशी लन करण्यालायक आहेत; आणि त्यांतही विशेषेकरून, आयची संस्कृत भाषा तर निव्वळ ज्ञानाची खाणच होय, असे ग्रीक लोकांस सहजच वाटू लागले. आणि ह्याचा प्रत्यक्ष व तात्कालिक परिणाम असा झाला की, आमच्या तत्वज्ञानाविषयी त्यांची जिज्ञासा जागृत होऊन, हें नूतनज्ञान संपादण्याच्या काम त्यांनी अहर्निश प्रयत्न चालविला. । | 1 * Brahmans, who were cen thcen considered by Greeks as the guardians of a most ancient and mysterious Disdom2. ( Max Muller's Science of Language. | vol. I. P. 99. ) २ एल्फिन्स्टन्रुत हिंदुस्थानचा इतिहास. 3 डा. हंटररुत हिंदुस्थानचा इतिहास. रोमेशचन्द्रदत्तरुत प्राचीन भारतेतिहास. नियार्कसू, आरियन्, डा. वाइजू, डा. रायल, इत्यादि पहा,