पान:भाषाशास्त्र.djvu/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१
सामान्यविवेचन व दिग्दर्शन.कांनी तिच्या पुरातनत्वाविषयीं नसता कुतर्क काढून, ती पुराणतम आहे हे सप्रमाण दाखविण्याबद्दल देखील, त्यांची एक अप्रत्यक्ष तऱ्हेची सूचना आहे. किंबहुना, ती बनावट किंवा ब्राह्मणांची कूटरचना नाहीं, हें शाबीद करून देण्याबद्दल, त्यांनी केवळ आग्रहच धरला आहे, असें म्हटलें असतां सुद्धां चालेल. परंतु, हा त्यांचा भ्रम नाहींसा करणें बिलकुल कठिण नसून, फारच सोपें आहे. कारण, हातच्या कांकणाला आरशाची अगदींच जरूरी नाहीं. एवढेंच नव्हें तर, अशा प्रकारच्या भ्रान्तिपटलांनी सत्यसूर्याचें तेज कमी न होतां, हे अज्ञानघन वितुळतांक्षणींच, त्याची चकाकी आपोआपच ज्यास्त मारूं लागते

 सर्व आर्य भाषांचे मूळ संस्कृत ( अर्थात् वैदिक संस्कृत ) असल्याचें आम्ही पूर्वीच सिद्ध करून दाखविलें आहे; व त्यावरून; इराणी, ग्रीक, ल्यॉटिन्, सेल्टिक,


 १ ह्यासंबंधानें मॉक्समुलर म्हणतोः-

 "I have frequently been asked, 'But how can you prove that Sanskrit literature is so old as it is supposed to be ? How can you fix any Indian dates before the time of Alexander's conquest ? What dependance can be placed on Sanskrit manuscripts which may have been forged or interpolated ?', ( Max Muller's Lectures. Science of Language. vol. I. P. 229. )

 २ संस्कृत हें ब्राह्मणांची कूटरचना असल्याविषयीं, ड्यूगल्डस्टुअर्टने तर शिक्के मोर्तबच ठोकिलें आहे.

 (Conjectures Concerning the origin of Sanskrit. Dugald stewart's Works. vol. III P. 72.)

 ३ भारतीय साम्राज्य उ. पु. ९ वें पहा.