Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
भाषाशास्त्र.



विषयीं, आम्ही पूर्वी सांगितले असून, ती गोष्ट भारतीय साम्राज्य पुस्तक नववें, यांत सिद्ध करूनही दाखविली आहे. मात्र, हें मूळ वैदिक संस्कृत होय, ही गोष्ट आम्हांला सुद्धा कबूल आहे. आणि तसे सदरहू ग्रंथांत आम्हीं सप्रमाण दाखविले पण आहे.

 तथापि, मॉक्समुलर प्रभृति, हे संस्कृतला मातृपदाचा बहुमान देण्याचें, किंवा तिला मायभाषा समजण्याचें, नाकारतात. मात्र, वरील सर्व भाषांची ती वडिल बहिण आहे, इतकें तरी निदान कबूल केल्याशिवाय गत्यन्तरच नाही, असे त्यांस वाटून, त्यांनी फक्त तितकीच गोष्ट मान्य केल्यासारखी दिसते. इतकेंच नव्हें तर, सर्व भाषांचे अग्रणीत्व संस्कृतलाच दिले पाहिजे, व भाषाशास्त्राची प्रगति संस्कृताशिवाय झालीच नसती, अशा संबंधाच्या प्रतिपादनांत देखील त्यांजला केवळ मानच डोलवावी लागते.

 अशा प्रकारची संस्कृत भाषेची थोरवी व तिचे पौराणत्व सर्व विद्वज्जनास मान्य असतांही, कित्येक कुत्सित लो-


 १ "Sanskrit, as we saw before, could not be called their parent, but only their elder Sister."

 (Max Muller's Lectures. Science of Language. vol. I. P. 194. )

 २ "And it has been truly said that Sanskrit is to the Science of language what mathematic's are to astronomy."

 ह्याच्याच पुढे अन्य विषयक विवेचन करतांना, मॉक्समुलरनें संस्कृताला सर्वभाषांची राज्ञी असें उपपद दिलें आहे; आणि ते तिला "Language of Languages" म्हणतात.

( Max Muller's Lectures. Sc. of L. P. 229. vol. I. )