पान:भाषाशास्त्र.djvu/311

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०२ भाषाशास्त्र. कामीं कांहींच कल्पना चालविली नसेल, अथवा हैं। लिपिज्ञान त्यांच्या कुशाग्र बुद्धीच्या अन्वेषणखलांतून अजिबात निसटून गेले असेल, असे सकृद्दर्शनी तरी खचितच बिलकुल अनुमानं होत नाही. कारण, ही लेखनविद्या नसली ह्मणजे ठिकठिकाणी अडचण येऊ पाहते, आणि विद्याभिनिवेशाचा प्रवाह अगदीच बंद पडतो. तेव्हां अर्थातच, जर आमचा हा प्रचंड बुद्धिवैभवनिझेर एकसारखा सरूच आहे, तर त्याचा चाललेला सतत प्रवाह धारण करण्यास, कांहीं तरी प्रचंड सांठवण करणे विशेष अवश्यकतेचे होते; अगर त्याचे योग्य प्रस्रवण होण्यास, विहित मार्ग तरी खुला करून दिला पाहिजे होता. कारण, तो नितान्त बलवान असल्यामुळे, निरुद्ध किंवा कंठित होणे अगदीच संभवनीय नव्हते. सवव. हैं उद्भवलेले संकट व आलेली अडचण दूर करण्यासाठी, आमचे आर्यपूर्वज लिपिज्ञानाची अ- लिपिज्ञानार्थ शनैः शनैः प्रवृत्त झाले; | आणि कांही ठरीव अशा सांकेतिक चिन्हांनी आपला अडून राहिलेला कार्यभाग त्यांनी उरकून घेतला. पुढे, ज्या द्रव्यांच्या योगाने ह्या सांकेतिक चिन्हांचे उपयोग करून घेता येईल असे त्यांस वाटले, त्यांचा त्यांनी सस्त उपयोग केला, व त्याचाच पुढे कालान्तराने, सर्वत्र फैलाव झाला. मात्र, आर्यच्या त्या प्राथमिक अवस्थेत, ह द्रव्ये अगदी साधी होती; व त्यामुळे, भूर्जपत्रे, तालपत्रं, १ गोल्डस्टकरचें पाणिनि पहा. ( पान १५-१६ ). * Journal Royal Asiatic Society. Article. XVI. वश्यकता.